नळदुर्ग / प्रतिनिधी-
 गंधोरा ता. तुळजापूर येथील रास्तभाव दुकानाचा परवाना निलंबीत करुन आज बराच कालावधी झाला आहे, दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. चारुशिला देशमुख यांनी चार आठवडयात या दुकानाची सर्व अभिलेखे जप्त करुन तात्काळ ताब्यात घेवून सदर दुकानाची धान्यवितरणाची चौकशी करुन स्वयंस्पष्ठ अहवाल तहसीलदार तुळजापूर यांनी पाठवून देण्याचा आदेश दिला आसताना ही तहसीलदार तुळजापूर यांनी तो अहवाल आदयाप पाठविला नसल्याने गावकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने केलेले ल्या पहिल्या लॉकडॉउन मध्ये गोर गरीब नागरीकांना व शेतकऱ्यांना तीन महीने गहू, तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान त्दि. १६ एप्रील २०२० रोजी  शासनाकडून मोफत देण्यात येणाऱ्या मालात आणि महीन्याला शिधापत्रिका धारकाला दिला जाणारा रास्तभाव दुकानाचा माल यामध्ये मोठया प्रमाणात संबंधीत दुकान चालकाने गैरव्यवहार केला आसल्याचे मंडळ अधिकारी नेमचंद शिंदे व तलाठी  यांनी केलेल्या पंचनाम्यामध्ये दिसून आले होते. शिवाय गंधोरा गावातील जवळपास ११४ शिधापत्रिकाधारकांनी या दुकानचालकाच्या विरोधात लेखी तक्रारी दिल्या होत्या की, आम्हाला शिधापत्रिकेनुसार माल देत नाही, चढया भावाने माल देतो, ग्राहकांशी अरेरावीची भाषा करतो आदी तक्रारी बरोर इतर ही तक्रारी नागरीकांनी लेखी स्वरुपात दिल्या होत्या. त्याच बरोबर ६५ शिधापत्रिका धारकांनी पंचनामा करताना लेखी जवाब ही संबधीत अधिकाऱ्यासमोर दिला होता. त्यामुळे तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तहसीलदार यांच्या कडे हा पचंनामा व नागरीकांच्या तक्रारी आणि जवाब पाठवून देवून तहसीलदार यांच्या अहवालानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. चारुशिला देशमुख यांनी दि. १९ एप्रील २०२० रोजी या दुकानाचा परवाना निलंबित केला आहे. त्याच बरोबर निलंबीत तारखेच्या दिवशी पासून या दुकानाचा तहसीलदार यांनी संबंधीत दुकानाचे सर्व अभिलेखे जप्त करुन ते ताब्यात घ्यावे आणि सदर रास्तभाव दुकानाची धान्य वितरणाची संपूर्ण सविस्तर चौकशी करुन, दुकानास जोडण्यात आलेल्या सर्व शिधापत्रिकाधारकांचे जवाब नोंदवूनच स्वयंस्पष्ठ अभिप्रायासह चौकशी अहवाल चार आठवडयात सादर करावा असा आदेश दिला होता.
मात्र संबधीत दुकानाचा तहसीलदार तुळजापूर यांना दिलेल्या आदेशाप्रमाणे त्यांच्याकडून तशी आदयाप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली दिसून येत नाही. कारण आज चार आठवडयाचा कालावधी संपूण बराच कालावधी झाला आहे परंतु आजून ही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे तहसीलदार तुळजापूर यांनी तो अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कडे दिला आहे किंवा नाही या बाबत गावकऱ्यांना कोणतीच माहीती दिली जात नाही. दरम्यान या प्रकरणी राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडून संबंधीत दुकानाला अभय देण्याचा प्रयत्न होत आसल्याची चर्चा सध्या गावात चालू आहे. त्यामुळे या प्रकरणी तहसीलदार तुळजापूर यांनी तात्काळ जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे त्यांचा अहवाल व शिधापत्रिकाधारकांचे जवाब पाठवून दयावेत अन्यथा गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ही यावेळी गावकऱ्यांनी दिला आहे.

 
Top