नळदुर्ग/ प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता आणि नळदुर्ग शहरात सध्या झालेला कोरोनाचा संसर्ग पाहता नळदुर्ग येथील बी. जी. लुक्स या सलून दुकानात आता ग्राहकांना व कारागिरांना कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी युज ॲन्ड थ्रो चा कपडा वापरत विविध साहीत्य वापरण्यात येत आसल्याने या दुकानात आता कोरोना विषाणूची भीती राहणार नाही. त्यामुळे शहरातील इतर सलून दुकानदारांनी अशी व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे.
शहरातील बी. जी. लुक्स या सलून दुकानात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विविध सेवा ग्राहकांना देण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दुकानातील कारागीरांना किंवा दुकानातून कोणत्याही ग्राहकांना किंवा ग्राहकांकडून दुकानदारांना होवू नये याची दक्षता घेण्यात आली आहे. त्यासाठी दुकानातील कारागीरांसाठी स्वत्रंत्र मास्क शिल्ड, हेल्मेट, हँन्ड ग्लोज वापरण्यात येत आहेत तर ग्राहकांसाठी दुकानात आल्यानंतर प्रथम सॅनिटायझरने हात निर्जतुंकीकरण करणे, त्या नंतर ग्राहकांच्या यादी नुसार त्यांना स्वतंत्र युज ॲन्ड थ्रो चा वस्तरा, कटींग कापड, तोंड पुसण्यासाठी युज ॲन्ड थ्रो चे कापड, दाढी नॅपकीन विदाऊट ब्रश अशी व्यवस्था या सलून दुकानात करण्यात आली आहे. त्यामुळे या दुकानात ग्राहकांना व कारागीरांना ही कोरोना विषाणूची भीती राहणार नाही. बी. जी. लुक्स मध्ये या ग्राहकांना देण्यात येणाऱ्या व्यवस्थेमुळे सध्या तरुण पिढी या दुकानाकडे आकर्षीत होत आहे. दरम्यान शहरात अनेक ठिकाणी  सलूनचे दुकाने आहेत, त्यामुळे या ही दुकान चालकांनी अशी ग्राहकांसाठी सोय केली तर सलून दुकानाच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा जो संसर्ग होणार आहे तो पूर्ण पणे टाळता येणार आहे म्हणून  शहरातील इतर दुकानदारांनी या बी. जी. लुक्स चा आदर्श घेण्यासारखा आहे.
 
Top