उस्मानाबाद /प्रतिनिधी
 दरवर्षी संजय निंबाळकर उस्मानाबाद शहरामध्ये वृक्ष लागवड करतात. नुसते वृक्षलागवड करुन प्रत्यक्ष ती झाडे जगली पाहिजे यासाठी वर्षभर प्रयत्नशील असतात स्वखर्चाने त्या झाडाची निगा राखणे, पाणी देणे, संरक्षण करणे इत्यादी गोष्टीवर जातीने लक्ष देतात. सन 2016 पासून सुरू झालेले वृक्षरोपण, वृक्ष संवर्धनाचे कार्य अविरतपणे यावर्षी पण सुरु ठेवले आहे. संजय निंबाळकर यांनी आत्तापर्यंत लावलेल्या रोपांचे रूपांतर मोठ्या मोठ्या वृक्षात झालेले आहे आणि तीच वृक्ष आज शहराचे वातावरण स्वच्छ, सौंदर्य वाढीचे कार्य करण्यासाठी उपयोगी ठरत आहेत. यावर्षी देखील 1000 वृक्षलागवड करण्याचे संजय निंबाळकर यांचे उद्दीष्ट आहे.
याची सुरुवात आज शहरातील पोलीस क्वार्टस, पोलीस ग्राऊंड ते शुभमंगल कार्यालय मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजुने, ज्ञानेश्वर नगर यासह शहारातील विविध भागात करण्यात आले. यावेळी वन विभागाचे अधिकारी गायकर साहेब, अशोक पवार साहेब, संजय निंबाळकर, तमन्नप्पा सुरळीकर, संजय पाटील दुधगांवकर, उदयसिंह निंबाळकर, शिवाजी निंबाळकर, लक्ष्मन माने, भिमाआण्णा जाधव ,नाना जमदाडे, रामभाऊ पडवळ, आप्पा पडवळ, राजाभाऊ बागल, विद्यापीठ उप-परिसराचे श्री.दिक्षीत साहेब, सोमवंशी, पिंटू कोकाटे, वाघामारे भाऊ, पांडुरंग भोसले, बालाजी जाधव, प्रकाश गवाड, काका गरड, महादेव माळी, कुणाल निंबाळकर, इ. मान्यवराचा हस्ते करण्यात आले.

 
Top