तुळजापूर /प्रतिनिधी -
 लॉकडाऊन मुळे मागील तीन महिने बंद असलेले पानशाँप उडण्यास परवानगी देण्याची मागणी पानशा़प व  होलसेलवाले व पान शाँप मध्ये काम करणा-या शंभर लोकांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, कोरोनामुळे मागील तीन महिन्यापासुन पानशाँप बंद असल्याने यावर अवलंबून असणा-या अनेक कुंटुंबियांनवर उपासमारीची वेळ आली आहे. यात काम करणाऱ्यां मंडळी ना उत्पनाचे दुसरे कुठलेही साधन नसल्यामुळे अनेक कु:टुंबियांना सध्या उपासमारीस सामोरे जावै लागत आहेत सदरील बाबीचा आपण गांभीर्य पुर्वक विचार करावा.व पानशा़प उघडण्यास परवानगी द्यावी यामध्ये प्रामुख्याने पानातील विविध प्रकार मसाले सुपारी इत्यादी चा समावेश असेल तंबाखू जन्य पदार्थ विक्री केली जाणार याची आम्ही निवेदन द्वारे हमी देतो, आपण दिलेल्या आदेशाचे आम्ही तंतोतंत पालन करु आम‘याकडे दुसरे कुठलेही साधन नसल्याने आम्हा सर्वांचे उपासमार थांबविण्यासाठी पानशाँप उघडण्यास परवानगी द्यावी, अशा मागणी चे निवेदन होलसेल व्यापारी छावाचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी,  विभागीय अध्यक्ष जीवनराजे इंगळ,े पानशाँप संघटनेचे प्रमुख राजाभाऊ चोपदार यांनी दिले आहे.
 
Top