उस्मानाबाद/ प्रतिनीधी
 पुर्व लडाखच्या LAC वर (वास्तविक नियंत्रण रेषा) भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली. पूर्व लडाखच्या गलवान घाटीमध्ये भारतीय सैन्यावर चिनी सैन्याने दगडांनी हल्ला करायला सुरुवात केली.
हल्ल्यामध्ये भारतीय बटालियनची कमान सांभाळणारे कर्नल संतोष बाबु आणि दोन सौनिक गंभीर जखमी झाले. दगडफेक आणि काठी, दंडूके यासह चिनी सैन्याने भारतीय सैन्यावर हल्ला करायला सुरुवात केली, दोन्ही देशाचे सैनिक बरेच तास एकमेकांशी लढत होते. रात्री उशिरा ही लढाई थांबली, या दरम्यान तापमान शुन्य अंशापर्यंत पर्यंत पोहचले होते. जखमी भारतीय सैनिकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने आर्मी हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले. भारतीय सैन्य व चीनच्या पीपुल्स लिबरेशन आर्मी मध्ये झालेल्या लढाईत भारताचे 20 जवान शहीद झाले. चिनी सैन्याने केलेल्या या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रभक्ती प्रतिष्ठान महाराष्ट्रचे संस्थापक अॅड. संजय भोरे यांनी जाहिर निषेध केला असून यापुढे चिनी वस्तूंची खरेदी न करता चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन राष्ट्रभक्ती प्रतिष्ठानच्या वतीने सबंध भारतीयांना करण्यात येत आहे.
 
Top