उस्मानाबाद/ प्रतिनिधी
राष्ट्रीय पशुधन अभियान (National Livestock Mission)  सन-2020-21 अंतर्गत  वैरण बियाणे प्रापण, संकलन व  वितरण या योजनेखाली  उस्मानाबाद जिल्ह्यातील  सर्वसाधारण प्रवर्गातील पशुपालक शेतकऱ्यांना  सुधारित जातीच्या चारा पिकांच्या बियाण्याचे आणि बहुवार्षिक चारा पिकांच्या ठोंबाचे  वाटप  शंभर टक्के अनुदानावर करावयाचे आहे. प्रति दहा गुंठे ( 10 आर) जमिनीच्या क्षेत्रासाठी या चारा पिकांच्या बियाण्याचे आणि ठोंबाचे वाटप सर्वसाधारण प्रवर्गातील पशुपालक शेतकऱ्यांना करण्यात येईल. दहा गुंठे क्षेत्रासाठी बारामाही  सिंचनाची  सुविधा असलेल्या  पशुपालकांना बहुवार्षिक चारा पिकांच्या   ठोंबाचे    वाटप करावयाचे आहे.
इच्छूक  लाभार्थीनी  अर्जाच्या  स्वरुपातील  प्रस्ताव  नजीकच्या  पशुवैद्यकीय  दवाखान्यामार्फत संबधित  तालुक्याचे  पशुधन  विकास अधिकारी ( विस्तार ) पंचायत समिती  यांच्याकडे दि. 25 जून, 2020  ते दि. 24 जुलै, 2020  पर्यंतच्या कालावधीत  सादर करावे. अर्जाचा नमुना आणि सोबत जोडावयाची कागदपत्रे, अटी  व  शर्ती याबाबतचा तपशील लाभार्थीशी निगडीत असलेल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात व संबधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी ( विस्तार ) पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध आहे.
अधिकच्या माहितीसाठी संबधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी विस्तार व नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेचे संस्थाप्रमुख यांच्याशी संपर्क साधावा. या योजनेचा सर्वसाधारण प्रवर्गातील पशुपालक, शेतकरी या लाभार्थीनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन  जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top