नळदुर्ग / प्रतिनिधी
कोरोनाच्या महामारीने जगावर संकट आले असताना भारतात देखील याचा प्रभाव वाढतच आहे यात सर्वात जास्त महाराष्ट्रात प्रादुर्भाव होताना दिसत आहे. जगातील सर्व वैद्यकीय संशोधक संशोधन करून कोरोनावर औषध तयार करत आहेत, औषधाबाबत वेगवेगळे दावे करीत आहेत पण अद्याप कोणतेही ठोस औषध उपलब्ध झालेले नाही. पण भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने प्रतिबंधित उपाययोजना म्हणून होमिओपॅथी चे आर्सेनिक अल्बम ३० हे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी उपयोगी ठरते असल्याने याची शिफारस केली आहे त्यामुळे कोरोनावर मोठ्या प्रमाणावर प्रतिबंध लागत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २०० च्या जवळपास पोहचली असून नळदुर्ग शहरात जून मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून आजपर्यंत नळदुर्ग मधील रुग्णांची संख्या 13 आहे यापैकी काही बरे झाले आहेत. रुग्ण कोरोना पॉसिटीव्ह निघाल्याने इनामदार गल्ली येथील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात आले आहे, आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने प्रतिबंधित क्षेत्र व परिसरातील  नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढावी आणि कोरोनाच्या प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आर्सेनिक अल्बम ३० हे औषध आणि या गोळ्या कशा घ्यायच्या याची पथ्ये काय आहेत याबाबत चे पत्रक जेष्ठ पत्रकार विलास येडगे व सामाजिक कार्यकर्ते अजहर जहागीरदार यांच्या हस्ते डॉ. शेख यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे, उपाध्यक्ष विशाल डुकरे, सचिव श्रमिक पोतदार आदी उपस्थित होते.
 
Top