उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित 10 कोटी वृक्ष लागवड 2020 कार्यक्रमांतर्गत जलसंपदा विभागाच्या वतीने वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी इंजि. सुदर्शन पगार अधीक्षक अभियंता, उस्मानाबाद पाटबंधारे मंडळ, उस्मानाबाद व इंजि. कृष्णा घुगे कार्यकारी अभियंता, कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग क्र.1, उस्मानाबाद यांचे शुभहस्ते सिंचन भवन परिसरात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आज दिनांक 15.06.2020 रोजी संपन्न झाला. सन 2020-2021 या वर्षात कृष्णा मराठवाडा बांधकाम विभागास 6416 वृक्ष लागवडीचे उदिष्ट् दिले असुन यावर्षी 100% पेक्षाही जास्त उदिष्ट् पूर्ण करण्याचा निर्धार इंजि. कृष्णा घुगे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
दरवर्षी जलसंपदा विभागाचा वृक्ष लागवडीसाठी सक्रिय सहभाग असतो. तसेच वृक्ष लागवडीच्या उदिष्टापेक्षा जास्तीची लागवड करून त्यांची जोपासना केली जाते. विभागाच्या वतीने वृक्ष लागवडीसाठी खड्डे घेण्याचे काम प्रगतीपथावर असुन लवकरच त्याठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास जलसंपदा विभागातील इंजि. एन एन कर्डिले, स.अ.श्रे.1, इंजि. ए आर मोतीपवळे, उपविभागीय अभियंता, इंजि. पी टी पाटील, उविभागीय अभियंता, इंजि.पी व्ही कांबळे, उपकार्यकारी अभियंता तसेच इतर अधिकारी व कर्मचारी सामाजिक अंतर राखुन कार्यक्रमास उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे नियोजनासाठी श्री विनोद डोंगरे, प्रथम लिपीक व श्री बाळासाहेब वाघ, भांडारपाल यांनी परिश्रम घेतले.

 
Top