तुळजापूर / प्रतिनिधी-
तालुक्यातील खडकी गाव कोरोना हाँटस्पाट असलेल्या सोलापूर जिल्हयाचा सिमेवर असल्याने  गावातील सर्व नागरीकांची थर्मल स्क्रिनिंग टेस्ट (ट्रेम्प्रेचर मशीन) ने प्राथमिक अरोग्य केंन्द्र काटगाव अंतर्गत तपासणी करावी अशी मागणी अजिंक्य बहुउद्देशिय सेवाभावी संस्था खडकी या संस्थेचे सचिव तथा महा एनजीओ फेडरेशन उस्मानाबाद जिल्हा समन्वयक राम जवान यांनी लेखी निवेदनाद्वारे खडकी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक एस. व्ही. दुधभाते यांच्याकडे केली आहे.
यावेळी लेखी निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की कोरोना आजाराने जगभरात हाहाकार माजवला आहे. या आजाराची तिव्रता शहरी भागात व दाट लोकसंख्या असलेल्या भागात दिसत होती.परंतु आता ग्रामीण  भागातही या आजाराचे प्रमाण प्रमाण वाढत आहे. त्यामुळे खडकी गावातील लोकांची तात्काळ प्राथमिक अरोग्य केंन्द्र काटगाव यांच्या अंतर्गत तपासणी करुन गावातील नागरीकांच्या अरोग्याची काळजी घ्यावी.
ही तपासणी केल्यामुळे नागरीकांना अरोग्यासंदर्भात माहिती मिळेल, त्यामुळे नागरिकही अरोग्याची दक्षता घेतील अशी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

 
Top