उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
महाराष्ट्र शासनाने कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी दि. 30 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत आदेश पारित केले होते. त्या आदेशात दुरुस्ती करुन दुरुस्तीचे आदेश पारित केले आहेत.
 ज्याअर्थी मी जिल्हाधिकारी  तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा  दीपा मुधोळ-मुंडे यांनी यापूर्वी दिलेल्या आदेशातील मुद्दा क्र. 5 मधील उपमुद्दा (V) नंतर खालील नमूद उपमुद्दयाचा समावेश केला आहे. शैक्षणिक संस्था ( विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा ) ची कार्यालये, कर्मचारी यांना सामग्री (e-content) चा विकास, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन, निकाल घोषित करणे यासह फक्त अशैक्षणिक कामकाजासाठी कार्यालये  चालू  ठेवण्यास परवानगी दिली आहे .

 
Top