उस्मानाबाद/ प्रतिनिधी
 सालासर कृषि ॲग्रो, पिपलीयामंडी, मंदसौर ,मध्यप्रदेश उत्पादित व पतंजली बायो रिसर्च इन्स्टीटूट प्रा.लि.फुड हर्बल पार्क 8,पदार्था लष्कर रोड,हरिद्वार,उत्तराखंड यांनी विपनन केलेले सोयाबीन बियाणे वाण-जे.एस.335 महाराष्ट्र राज्याचा विक्रीचा परवाना न घेता विक्री केल्याचे आढळुन आल्याने संबधीत कंपनीवर तसेच कृष्णाई शेती विकास केंद्र जुने बस स्टॅड मेन रोड तेर व श्रीनिवास कृषि सेवा केंद्र,सुनिल प्लाझा उस्मानाबाद यांचे विरुध आनंदनगर पोलीस ठाणे उस्मानाबाद येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,दिनांक 04/06/2020 रोजी जिल्हास्तरीय भरारी पथकातील अधिकारी डॉ.टी.जी.चिमनशेटे कृषि विकास अधिकारी जिल्हा उस्मानाबाद श्री.ए.ए.काशीद कृषि उपसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद, श्री.सी.जी.जाधव जिल्हा गुननियंत्रण निरीक्षक, उस्मानाबाद, श्री.व्ही.एस.निरडे मोहीम अधिकारी जिल्हा परिषद,उस्मानाबाद, श्री.बी.आर.राऊत, कृ्‌षि अधिकारी पंचायत समिती,उस्मानाबाद यांनी तपासणी केली असता कृष्णाई शेती विकास केंद्र जुने बस स्टॅड मेन रोड तेर येथे सालासर कृषि ॲग्रो, पिपलीयामंडी, मंदसौर ,मध्यप्रदेश उत्पादित व पतंजली बायो रिसर्च इन्स्टीटूट प्रा.लि.फुड हर्बल पार्क 8,पदार्था लष्कर रोड,हरिद्वार,उत्तराखंड यांनी विपनन केलेले सोयाबीन बियाणे वाण-जे.एस.335 348 बॅग (30 किलो) ज्याची किंमत 9,22,000 रु.(प्रत्येकी 2650/-) आढळून आल्याने पंचनामा करुन विक्री बंद आदेश बजावण्यात आले. अशाच प्रकारचे सोयाबिन वाण-जे.एस. श्रीनिवास कृषि सेवा केंद्र, सुनिल प्लाझा, उस्मानाबाद या कृषि सेवा केंद्राची जिल्हास्तरीय भरारी पथकातील अधिकारी डॉ.टी.जी.चिमनशेटे कृषि विकास अधिकारी जिल्हा उस्मानाबाद, श्री.व्ही.एस.निरडे मोहीम अधिकारी जिल्हा परिषद,उस्मानाबाद, श्री.बी.आर.राऊत, कृ्‌षि अधिकारी पंचायत समिती,उस्मानाबाद यांना तपासणी वेळी आढळून आल्याने  65 बॅग (30 किलो) ज्याची किंमत 1,72,250/- रु.(प्रत्येकी 2650/-) विक्री बंद आदेश बजावण्यात आले. याबाबत कृषि आयुक्तालयास पत्रव्यवहार करुन संबधित कंपनीस महाराष्ट्र राज्यात सोयाबिन बियाणे विक्रीचा परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता कृषि आयुक्तालय पूणे यांचेकडून संबधित कंपनीस  महाराष्ट्र राज्याचा बियाणे विक्रीचा परवाना देण्यात आला नसल्याचे कळविण्यात आलेले आहे.
त्यामुळे सालासर कृषि ॲग्रो, पिपलीयामंडी, मंदसौर ,मध्यप्रदेश उत्पादित व पतंजली बायो रिसर्च इन्स्टीटूट प्रा.लि.फुड हर्बल पार्क 8,पदार्था लष्कर रोड,हरिद्वार,उत्तराखंड या कंपनीचे संचालक, उत्पादन व्यवस्थापक यांचे विरुध्द बियाणे कायदा 19666 चे कलम 2(8),2(9),2(11)(i) व कलम 5 तसेच बियाणे नियंत्रण आदेश 1983 चे खंड 3(1) व 5 तसेच श्रीनिवास कृषि सेवा केंद्र, सुनिल प्लाझा उस्मानाबाद ता.जि.उस्मानाबाद या विक्री केंद्राचे प्रोपरायटर नेहा नवनाथ भोईटे रा.काकडे प्लॉट, ग्रामसेवक कॉलनी, उस्मानाबाद यांचे विरुध्द बियाणे कायदा 19666 चे कलम 2(8),2(9),2(11)(i) व कलम 5 तसेच बियाणे नियंत्रण आदेश 1983 चे खंड 3(1) व 5,6,7 व भां.द.वि कलम 420 तसेच कृष्णाई शेती विकास केंद्र जुने बस स्टँड मेन रोड तेर ता.जि.उस्मानाबाद चे प्रोपरायटर श्री.विजय शशिकांत सावंत यांचे विरुध्द बियाणे कायदा 19666 चे कलम 2(8),2(9),2(11)(i) व कलम 5 तसेच बियाणे नियंत्रण आदेश 1983 चे खंड 3(1) व 5 व भां.द.वि कलम 420 नूसार श्री.बी.आर.राऊत कृषि अधिकारी पं.स उस्मानाबाद यांनी सरकारतर्फे आनंदनगर पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे.
सदरची कार्यवाही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.बी.यु.मंगरुळकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
 
Top