उमरगा / प्रतिनिधी-
 देश सेवेत असताना व सेवानिवृत्त झाल्यावर ज्यांच्या विचारात आणि आचरणात सदैव देश सेवा हाच धर्म असतो. अशा माजी सैनीकांच्या  सर्व  समस्या  सोडविण्यासाठी सदैव आग्रही राहून त्यांना प्राधान्य देणार, अशी ग्वाही आ.ज्ञानराज चौगुले यांनी उमरगा-लोहारा तालुक्यातील भारतीय माजी सैनिक संघटनेच्या एका कार्यक्रमात दिली.
यावेळी उमरगा व लोहारा तालुक्यातील सर्व माजी सैनिक कुटुंबियांना (सुमारे 1200) अर्सेनिक अल्बम - 30 गोळ्यांचेही वाटप करण्यात आले.
 तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहोरात्र काम करणाऱ्या उमरगा व लोहारा तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून सुमारे 350 पोलीस कर्मचारी, अधिकारी व होमगार्ड यांच्यासाठी आर्सेनिक अल्बम - 30 गोळ्या व खोकल्याच्या औषधाचे वाटप करण्यात आले.
यावेळी युवा नेते किरण गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, भारतिय माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहाजी चालुक्य, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा गुरव, पोलीस माधवराव गुंडीले, गटनेते संतोष सगर, शरद पवार, योगेश तपसाळे, संदीप चौगुले, मनोज जाधव, कमलाकर आळंगे, आदी उपस्थित होते.
 
Top