उमरगा  /प्रतिनिधी
 कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व व्यापाऱ्यांच्या सुविधेसाठी कमी दरात मालवाहतूक सेवा देण्याच्या उद्देशाने रा.प. महामंडळाद्वारे  मालवाहतूक सेवा देण्याच्या उद्देशाने रा.प.म. द्वारे मालवाहतूक सुविधा सुरू करण्याचे ठरवले आहे.  या अनुषंगाने उमरगा कृषी उत्पन्न बाजार समिती येथील व्यापाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सदर मालवाहतुक बसचे पूजन करण्यात आले.
 राज्य परिवहन महामंडळाद्वारे यासाठी अत्यंत माफक दर ठेवण्यात आले असून सुमारे 9 टन क्षमता असलेल्या गाडीत 100 किलोमीटर साठी एक टन मालास 500 रुपये इतका दर ठरवण्यात आला आहे. यासाठी सध्या उमरगा आगाराकडे एक मालवाहतुक बस उपलब्ध असून मागणीनुसार आणखी बसगाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.तरी राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहतूक सुविधेचा जास्तीत जास्त शेतकरी व व्यापारी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे.
यावेळी युवा नेते किरण गायकवाड, आगार व्यवस्थापक कुलकर्णी, बाजार समितीचे सभापती मोहयोद्दीन सुलतान, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, जेष्ठ शिवसैनिक अशोक सांगवे, बाजार समितीचे संचालक सचिन जाधव, बळीराम सुरवसे, शरद पवार, आदी उपस्थित होते.

 
Top