उस्मानाबाद/प्रतिनिधी-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेचा रसिक श्रोत्यांना घरबसल्या आनंद घेता येणार आहे. या व्याख्यानमालेची सुरुवात सकाळ व साम टीव्ही विधिमंडळ प्रतिनिधी तथा राजकीय विश्लेषक संजय मिस्कीन हे 15 जून रोजी पहिले पुष्प गुंफणार आहेत.ते “उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाच्या दिशा व मार्ग” या विषयांवर आपले व्याख्यान देणार आहेत.16 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वक्ता कार्यकर्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके हे “महाराष्ट्राच्या जडणघडणीत खा.शरद पवार यांचे योगदान” या विषयावर दूसरे पूष्प गुंफणार आहेत.तर व्याख्यानमालेचा समारोप उद्योजक व रावण राजा राक्षसांचा या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक शरद तांदळे  “कोरोना नंतरच्या उद्योगातील संधी” या विषयावर 17 जून रोजी तिसरे पूष्प गुंफून समारोप करणार आहेत.
आॕनलाईन व्याख्यानमालेचे थेट प्रसारण राजकीय कट्टा व डॉ.प्रतापसिंह पाटील या फेसबुक पेज वरून सायंकाळी ७-०० वा. करण्यात येणार आहे.कोरोनामुळे गर्दी जमवण्यास निर्बंध असल्यामूळे डॉ.वेदप्रकाश पाटील सोशल फाउंडेशन उस्मानाबाद यांच्या वतीने अनोख्या अशा ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे तरी रसिक श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन  संयोजकांकडून करण्यात आले आहे.

 
Top