नळदुर्ग/प्रतिनिधी -
नळदुर्ग येथील कोरोना प्रतिबंधक क्षेत्रातील कुटूंबाना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांच्या कै. दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठाणच्या वतीने ( मदत नव्हे कर्तव्य समजून ) 105 कुटूंबांना जीवनाश्यक किराणा वस्तूचे किट भेट देण्यात आले आहे. हे किट नळदुर्ग नगरीचे नगरसेवक नितीन कासार, महालिंग स्वामी, माजी नगरसेवक आमृत पूदाले, शब्बीर कुरेशी, किशोर नळदुर्गकर, नवल जाधव, ताजोददीन सावकार, गणेश मोरडे, सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे आदींच्या हस्ते देण्यात आले.
नळदुर्ग शहरात कोरोना चा एक रुग्ण सापडलेल्या मुलतान गल्ली व किल्ला गेट या परिसरात पालिका प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधक क्षेत्र जाहीर करुन हा परिसर सिल करण्यात आला आहे. दरम्यान या परिसरातील कुटूंब हे दररोज कामावर जावून आपला उदरनिर्वाह भागवतात मात्र सध्या त्यांचा परिसर सिल करण्यात आल्यामुळे त्यांच्या हाताला काम नाही, म्हणून त्यांच्या कुटूंबाची उपासमार होवू नये म्हणून या संदर्भात दि. सहा जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी या परिसराला भेट देवून येथील नागरीकांची विचारपूस केली शिवाय त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन केले त्याच बरोबर शासनाने सांगितलेल्या आटींचे पालन करुन या कोरोना विषाणूला पळवून लावण्याचे आवाहन ही यावेळी त्यांनी केले होते. दरम्यान त्यांच्याकडून संपूर्ण शहरात सुमारे एक हजार दोनशे अर्सेनिक अल्बम 30 गोळयाचे बाटलीचे वाटप ही त्यांच्याकडून शहरात गोर गरीब नागरीकांना करण्यात आले आहे. शिवाय शहरातील कोरोना प्रतिबंधीत क्षेत्रातील कुटूंबाची उपासमार होवू नये यासाठी त्यांच्याकडून या सर्व कुटूंबांना दि. 9 जून रोजी जीवनाश्यक वस्तूचे किट ही भेट देण्यात आले. या किट मध्ये साखर, तांदुळ, तेल, पोहे, मसुर दाळ, चहापत्ती, कपडयाचे साबण, आंघोळीचे साबण, हळद पावडर, मिरची पावडर, पारले बिस्कीट आदी देण्यात आले आहे. नगरसेवक नितीन कासार, महालिंग स्वामी, माजी नगरसेवक आमृत पूदाले, शब्बीर कुरेशी, किशोर नळदुर्गकर, सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, आर के कुरेशी, ताजोददीन सावकार, गणेश मोरडे, सामाजिक कार्यकर्ते नवल जाधव आदींच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी शासनाने घालून दिलेल्या आटीचे पालन करीत सॅनिटायझरचा वापर करुन व सामाजिक अंतर ठेवून या किटचे वाटप करण्यात आले आहे.
दरम्यान अशोक जगदाळे यांच्याकडून या मिळालेल्या मदतीमुळे आम्ही भारावून गेलो आहोत, आमच्या आरोग्याची काळजी घेवून जीवनाश्यक वस्तूच्या किटचे वाटप करुन आम्हाला दिलासा दिला आसल्याचे कौतुकाचे उदगार यावेळी कोरोना प्रतिबंधीत क्षेत्रातील कुटूंबानी काढले. संपूर्ण शहरातील एक हजार दोनशे कुटूंबाना पूरतील असे होमीओपॅथीच्या अर्सेनिक अल्बम 30 गोळयाचे वाटप ही त्यांच्यावतीने त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाटप केले आहे. त्याच बरोबर आणखीन ही दुसऱ्या टप्प्याच्या अर्सेनिक अल्ब्म 30 गोळयाचे वाटप ही त्यांच्या कडून करण्यात येणार आहे. यावेळी महेश जळकोटे, रणजित डूकरे, जेष्ठ पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, आयुब शेख, दादासाहेब बनसाडे, प्रविण चव्हाण, सुनिल गव्हाणे, उमेश जाधव, अफसर जमादार, इरफान इनामदार, अमीत शेंडगे, सुजीत बिराजदार, सचिन भोई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थीत होते.
 
Top