उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा (COVID-१९) प्रादुर्भाव होऊ नये यासाठी करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विदेशातून आलेले नागरिक ज्यांना त्यांच्या तालुक्याच्या  शासकीय, खाजगी  रुग्णालयांमधील आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले आहे. तालुक्यातील अधिग्रहित केलेल्या इमारतीमध्ये इन्स्टीट्युशनल क्वारन्टाईन करुन ठेवण्यात आले आहे. तसेच कोरोना संदर्भात संभाव्य व्यक्तींची तपासणी करुन त्यांना त्यांचे घरीच होम क्वारन्टाईन करुन ठेवण्यात आलेले आहे. अशा व्यक्तींच्या आरोग्याची  दैनंदिन माहिती प्राप्त करण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
या नियंत्रण कक्षात खालीलप्रमाणे अधिकारी,  कर्मचारी  यांची माहे जुलै-2020 व ऑगस्ट-2020 या महिन्याकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. सोमवार या दिवशी सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीसाठी  श्री. वाय. बी. जाधव, अनुरेखक कार्यकारी अभियंता (मो.८३२९५१६३९३), श्री.जे.के.गायकवाड, कनिष्ठ लिपीक, सार्वजनिक बांधकाम विभाग, उस्मानाबाद (मो.९४२३३४०२५३). रात्री ८ ते सकाळी ८ या कालावधीसाठी  श्री.व्ही.पी.काळे, कनिष्ठ लिपीक,  सहायक जिल्हा निबंधक (मो. ९८८१३०२९००),श्री.जी.के. चौधरी, कनिष्ठ लिपीक, वर्ग १(नि श्रे) तथा मुद्रांक जिल्हाधिकारी उस्मानाबाद (मो. ९६६५३२७००९) यांची नियुक्ती करण्यात आली आहे . मंगळवार या दिवशी सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीसाठी श्री. पी.डी.कांबळे, लिपीक-नि-टंकलेखक, कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग (मो.९३७३४७३८८४),   श्री. पी.ए.घाटुळ, कनिष्ठ लिपीक, उस्मानाबाद (मो. ९९२१७२७५७४).  रात्री ८ ते सकाळी ८ या कालावधीसाठी श्री. एस.सी.दुरुगकर, वरिष्ठ लिपीक, उपविभागीय अधिकारी सां.बां. विशेष प्रकल्प. (मो. ९०९६७३३७६३), श्री. एस. पी. पिंपळे, स्थापत्य (इमारती), उपविभाग अभियांत्रिकी सहाय्यक, उस्मानाबाद (मो.8390600073) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बुधवार या दिवशी सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीसाठी श्री.डी.बी.डोलारे, कनिष्ठ अभियंता, उपविभागीय अधिकारी (मो.९८५०४००४८६), श्री.एस.जी.शेख, कनिष्ठ लिपिक, सां.बां. विशेष प्रकल्प (इमारती) उपविभाग उस्मानाबाद (मो. ७०२०८७०३१९). रात्री ८ ते सकाळी ८ या कालावधीसाठी  श्री. बी. डी. शिरसठ, वरिष्ठ लिपिक सहाय्यक (मो.९९२१८८६३६६), श्री. वाय.एस.भोसले, समाज कल्याण निरीक्षक, उस्मानाबाद (मो.९८२२२५७७८८) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवार या दिवशी  सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीसाठी श्री. एस.आर. शामराज, वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती, उस्मानाबाद (मो. ८२७५४४८७२०),  श्री.ए.के.कुलकर्णी, कनिष्ठ सहाय्यक (मो. ९४०३९८०७००). रात्री ८ ते सकाळी ८ या कालावधीसाठी श्री.जी.एस.बिराजदार, वरिष्ठ शिक्षणाधिकारी,  प्रा. जि.प.उस्मानाबाद (मो. ९८३४६४१२०३),  श्री. जी.एल.लाळे, कनिष्ठ सहाय्यक (मो. ९४२१८७१९५९) यांची नियुक्ती केली आहे. शुक्रवार या दिवशी  सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीसाठी श्री. ए.आर.ढवळे, कनिष्ठ लिपिक, जिल्हा विशेष लेखा (मो. ९४२१३५७७६३), श्री. आर.व्ही.सलगर, उपलेखा परीक्षक, परीक्षक वर्ग सहकारी संस्था, उस्मानाबाद (मो. ७९७२२४८८२५), रात्री ८ ते सकाळी ८ या कालावधीसाठी श्री. एम.एस.शिंदे, समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद (मो. ९४२२९२३०४३), श्री. ए.ए. जगताप, समाज कल्याण निरीक्षक,उस्मानाबाद (मो. ७५८८८२०७५६) यांची नियुक्ती केली आहे. शनिवार या दिवशी  सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीसाठी श्री.एस.एस.देवकर, वरिष्ठ लिपीक उप कार्यकारी अभियंता, उपसा सिंचन (मो. ७९७२४२९४७०), श्री. एस.ए.सदरे, लिपीक टंकलेखक सिंचन विभाग  उस्मानाबाद (मो. ९६६५२७५२७४).   रात्री ८ ते सकाळी ८ या कालावधीसाठी श्री. एस.एन.अनसिंगकर, कनिष्ठ सहाय्यक, जिल्हा जलसंधारण अधिकारी जि.प. ल.पा.उस्मानाबाद (मो.९९२१३५६८४१), श्री. एस.एस.मशायक, कनिष्ठ यांत्रिकी कार्यकारी अभियंता(बां) जि.प.उस्मानाबाद   (मो. ९४२१३६०२७८) यांची नियुक्ती केली आहे. रविवार या दिवशी सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीसाठी श्री.पाटील एस.आर.,वरिष्ठ लिपीक, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग उस्मानाबाद (मो. ९४२१३५६८५१), श्री. के.आर.सिद्दीकी, वरिष्ठ लिपीक (मो.८४८४९४६४९५). रात्री ८ ते सकाळी ८  या कालावधीसाठी श्री. व्ही.के.बांगर, प्रथम लिपीक कार्यकारी अभियंता, (मो.9595919155), श्री.एस.एस.काळे, वरिष्ठ लिपीक लघुपाटबंधारे विभाग, उस्मानाबाद (मो. ७४९८३८९९१२) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 नियंत्रण कक्षांमध्ये नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी खालीलप्रमाणे कामकाज करुन त्याबाबतची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडे सादर करावी. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या तालुका नियंत्रण कक्षांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना दर तीन तासांनी दूरध्वनीद्वारे संपर्क करुन कोरोना विषाणू (COVID-१९) च्या संदर्भात माहिती घ्यावी. तालुका नियंत्रण कक्षामध्ये नेमलेल्या या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून तालुक्याच्या शासकीय, खाजगी  रुग्णालयांमधील आयसोलेशन वॉर्डमधील व्यक्ती, तालुक्यातील अधिग्रहित केलेल्या इमारतींमधील इन्स्टीट्युशनल क्वारन्टाईन व्यक्ती आणि  होम क्वारन्टाईन व्यक्तींबाबतची  माहिती  दर तीन तासांनी संकलित करुन जिल्हा नियंत्रण कक्षामध्ये नोंद करुन ठेवावी. ही माहिती दररोज सकाळी ११.०० वाजता व सायंकाळी ५.०० वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडे सादर करावी.तालुक्याच्या शासकीय, खाजगी रुग्णालयांमधील आयसोलेशन वॉर्डमधील व्यक्ती, तालुक्यातील अधिग्रहित केलेल्या इमारतींमधील इन्स्टीटयुशनल क्वारन्टाईन करुन ठेवण्यात आलेल्या व्यक्ती तसेच होम क्वारन्टाईन व्यक्ती या संबंधित आयसोलेशन वॉर्ड, इन्स्टिट्युशनल क्वारन्टाईन तसेच होम क्वारन्टाईनमध्येच आहेत किंवा कसे ? याबाबत खात्री करणे. तालुक्याच्या शासकीय, खाजगी रुग्णालयांमधील आयसोलेशन वॉर्डमधील व्यक्ती, तालुक्यातील अधिग्रहित केलेल्या इमारतींमधील इन्स्टीट्युशनल क्वारन्टाईन करुन ठेवण्यात आलेल्या व्यक्ती तसेच होम क्वारन्टाईन व्यक्तींच्या आरोग्यस्थितीची माहिती घेऊन त्याच्या नोंदी ठेवणे.
तालुक्याच्या शासकीय, खाजगी रुग्णालयांमधील आयसोलेशन वॉर्डमधील व्यक्ती, तालुक्यातील अधिग्रहित केलेल्या इमारतींमधील इन्स्टीट्युशनल क्वारन्टाईन करुन ठेवण्यात आलेल्या व्यक्ती तसेच होम क्वारन्टाईन व्यक्ती अन्य लोकांच्या, जनतेच्या संपर्कात येत नसल्याबाबत खात्री करणे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या शासकीय, खाजगी  रुग्णालयांमधील आयसोलेशन वॉर्डमधील व्यक्ती, तालुक्यातील अधिग्रहित केलेल्या इमारतींमधील इन्स्टीट्युशनल क्वारन्टाईन करुन ठेवण्यात आलेल्या व्यक्ती तसेच होम क्वारन्टाईन व्यक्तींचे संपर्क क्रमांक संबंधित तालुक्याच्या नियंत्रण कक्षाकडून प्राप्त करुन घेणे व अशा व्यक्तींना रॅण्डमली संपर्क करुन त्या व्यक्तीशी संबंधित आयसोलेशन वॉर्ड, इन्स्टिट्युशनल क्वारन्टाईन तसेच होम क्वारन्टाईनमध्येच आहेत किंवा कसे ? याबाबत खात्री करावी. अशा व्यक्तींच्या आरोग्यस्थितीची माहिती घेऊन त्याच्या नोंदी ठेवाव्यात. अशा व्यक्ती अन्य लोकांच्या, जनतेच्या संपर्कात येत नसल्याबाबत खात्री करावी. या कामामध्ये हलगर्जी, टाळाटाळ, कुचराई करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. हे आदेश तात्काळ लागू करण्यात येत असून याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
 
Top