औरंगाबाद /प्रतिनिधी-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आंतरविद्याशाखेच्या अधिष्ठातापदाची सूत्रे डॉ चेतना सोनकांबळे यांनी स्विकारली आहेत. या विद्याशाखेच्या पहिल्यांदाच पूर्णवेळ अधिष्ठाता नियुक्त करण्यात आले आहे.
कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने विविध संवैधानिक अधिका-यांच्या नियुक्ती मार्चमध्ये केली होती. यामध्ये आंतर विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी डॉ.चेतना प्रल्हाद सोनकांबळे यांची नियुक्ती करण्यात आली.
डॉ सोनकांबळे यांनी डॉ संजीवनी मुळे यांच्याकडून सोमवारी  अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारला. सध्या त्या कोल्हापूरच्या
शिवाजी विद्यापीठात शिक्षण शास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थी कल्याण मंडळ संचालक म्हणूनही कार्य केले आहे. कुलगुरू डॉ प्रमोद येवले, प्रकुलगुरू डॉ प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ जयश्री सूर्यवंशी यांनी डॉ सोनकांबळे यांचे अभिनंदन केले . 
 
Top