उस्मानाबाद /प्रतिनिधी-
विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये या हेतूने ऑफलाईन पद्धतीनेदेखील  परीक्षा आवेदनपत्र स्विकारण्याची प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी तसेच त्यासंबंधीच्या सुचना महाविद्यालयांना देण्यात याव्यात अशी मागणी युवा  सेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.  या मागणीचे निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर मा. कुलगुरूंना देण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे सर्व संबंधीतांना मार्च/एप्रिल, 2020 मधील नियोजित परीक्षेसाठी विद्यापीठ अनुदान आयोग, नवि दिल्ली आणि महाराष्ट्र शासन यांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सुचनान्वये विद्यापीठाने परीक्षेसंबंधी जाहीर केलेल्या धोरणानुसार  एक खास बाब म्हणून पात्र  परीक्षार्थीना, विद्यापीठ मुख्य परीसरातील शैक्षणिक विभाग व  उपपरीसरातील सर्व  सर्व शैक्षणिक विभागातील परीक्षार्थींना तसेच सर्व संलग्नीत महाविद्यालये/परिसंस्थातील व्यावसायिक  अभ्यासक्रमांच्या परिक्षार्थींना ऑनलाईन पद्धतींना  परीक्षा आवेदन पत्र भरण्यासाठी अंतिम दिनांक 05/06/2020 हा  देण्यात आला होता.
 परंतु बँकेमार्फत गेटवे पेमेंट व इतर बाबींच्या अडचणीमुळे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठीची लिंक सुरु करने शक्य न झाल्यामुळे मार्च/एप्रिल,2020 च्या परीक्षेसाठी वरीलप्रमाणे सर्व पात्र  परीक्षार्थींचे परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी दिनांक 12/06/2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे असे विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.गणेश मांझा यांनी दि.05/06/2020 रोजी मुदतवाढ परिपत्रकाद्वारे कळविले आहे. परंतु पुर्वीचे परीपत्रक  व आत्ताच्या मुदतवाढ परीपत्रकामध्ये ऑफलाईन पद्धतीचे परीक्षा आवेदनपत्र स्विकारण्यासंदर्भात कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. तेव्हा  सदर  विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये या हेतूने ऑफलाईन पद्धतीनेदेखील  परीक्षा आवेदनपत्र स्विकारण्याची प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी तसेच त्यासंबंधीच्या सुचना महाविद्यालयांना देण्यात याव्यात अशी मागणी युवा  सेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. निवेदनावर युवासेनेचे जिल्हा समन्वयक अॅड. संजय भोरे व तालुका सह संघटक व्यंकटेश कोळी यांच्या सह्या आहेत.
 
Top