उमरगा/प्रतिनिधी
 शहरातील कोविड रुग्णालयात गेल्या तीन महिन्यात सोळा पॉझिटिव्ह व्यक्तीवर उपचार करण्यात आले. त्यातील बेडगा येथील एका जेष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून १४ जणांना यापूर्वी कोरोनामुक्त करण्यात आले आहे बुधवारी (१०) केसरजवळगाच्या तेरा वर्षीय युवकास डिस्चार्ज देण्यात आल्याने तीन महिन्यात दोन वेळा तालुका कोरोनामुक्त झाला आहे.
शहर व तालुक्यात प्रारंभी कोरोनाचा संसर्ग झालेला नव्हता. मात्र परराज्य, जिल्हयातून तालुका, शहरात दाखल झालेल्या नागरिकांना तपासणीसाठी कोरोना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले. एक ते तीन एप्रिल दरम्यान पानिपतहून गावाकडे परतलेले बलसूर, उमरगा शहर व लोहारा तालुक्यातील मुंबई येथून आलेल्या धानुरी येथील तिघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुका व जिल्ह्यात पहिल्यांदा तीन कोरोनाबाधित आढळून आल्यावर एकच भीती निर्माण झाली होती.तीन जणावर कोरोना उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार करून १४ दिवसानंतर स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने तिघांना २० एप्रिल रोजी कोरोनामूक्त झाल्याने रुग्णालयातून सोडण्यात आले होते. कोरोनामुक्त तालुका म्हणून नागरिकांनी दिड महिना सुटकेचा श्वास घेतला अन तालुक्यात परजिल्हा व राज्यातून येणाऱ्या लोकांचे दिवसेंदिवस लोंढे वाढत चालल्याने पुन्हां दहशत निर्माण झाली होती. बाहेरून येणाऱ्या कामगारांचे प्रशासनाकडून तपासणी करून होम क्वारंटाईन व विलगिकरण कक्षात निगराणीखाली ठेवले असताना मुंबईहून तालुक्यात आलेल्या व्यक्तीमुळे ४६ दिवसा नंतर २१ मे पासुन पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढत गेली अन तालुक्यात तब्बल १३ जण कोरोनाबाधित आढळून आल्याने तालुक्यातील व शहरातील सीमा लॉक करण्यात आल्या. प्रारंभी मुंबईहून नातेवाईका कडे आलेल्या एका महिलेसह तीन जण, सोलापूर हून लग्नासाठी आलेल्या काकाच्या संपर्कात आल्या ने एक नववधू असे चार जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने नागरिकांमध्ये बाहेरून आलेल्या व्यक्तीक डे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला होता. मुंबई येथील कांदिवलीहून गावाकडे आलेल्या बेडग्याचा बाधित जेष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला अन त्यांच्या कुटूंबातील चार जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असता अहवाल पॉझिटिव्ह आले. कोथळी येथे पुणे येथून आलेला एक, मुंबईहून केसरजवळगा येथे आलेले चार जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १३ वर गेल्याने शहरातील कोरोना उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. कर्नाटकातील मुंबईहुन नातेवाईकांकडे शहरात आलेल्या एका महिलेला डिस्चार्ज देण्यात आला त्यानंतर उपचाराचा कालावधी पूर्ण झालेल्या चार जणांना डिस्चार्ज देण्यात आले, मुंबईहुन शहरा त आलेल्या महिलेच्या संपर्कातील नऊ वर्षाचा एक मुलगा, केसरजवळगा येथील ६० वर्षीय जेष्ठ महिला आणि अकरा वर्षाचा नातूस रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. पाच जूनला मुंबईहून बेडगा गावात आलेल्या मयत जेष्ठ नागरिकाची पत्नी, नात यांना दहा दिवसाचा उपचाराचा कालावधी संपल्याने तर दोन दिवसांनंतर बेडग्याच्या एकास डिस्चार्ज दिल्या नंतर बुधवारी सकाळी केसरजवळगा येथील महिले च्या एका मुलास डिस्चार्ज दिल्याने वीस दिवसात १३ जणांवर वैद्यकीय अधीक्षक डॉ पंडीत पुरी यांचे मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ विक्रम आळंगेकर, डॉ प्रवीण जगताप,डॉ विनोद जाधव, डॉ सुनंदा जाधव, डॉ सुनंदा गोरे, तालुका आरोग्य अधि-कारी डॉ सुहास साळुंके,आरोग्य सेवक, परिचारिका, एसीजी तंत्रज्ञ पदमाकर घोगे, रुग्णवाहिका चालक युवराज ऐडसन, प्रकाश भोसले, संतोष मोरे यांच्या सह कर्मचाऱ्यांनी २४ तास रुग्णावर उपचार केल्याने दुसऱ्या टप्प्यातील तेरा जण कोरोना मुक्त झाल्याने तीन महिन्यात दोन वेळा तालुका कोरोनामुक्त झाला असल्याने उमरगेकरांना दिलासा मिळाला आहे.
   ४१५७ जणांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण
ग्रामीण भागात दहा एप्रिलपासून दहा जूनपर्यंत ग्रामीण भागात परराज्य व जिल्ह्यातून चार हजार २८३ व्यक्ती दाखल झाल्या होत्या. त्यापैकी आता पर्यंत चौदा दिवसाचा कालावधी पूर्ण झालेल्या दोन हजार ८३१ लोकांना घरी पाठवण्यात आले आहे. तर उमरगा शहरात एक हजार ३२९ व्यक्ती दाखल झाल्या होत्या त्यापैकी चौदा दिवसाचा कालावधी पूर्ण झालेल्या एक हजार लोकांना घरी पाठवण्यात आले आहे. मुरूम शहरात दाखल झालेल्या सहाशे व्यक्तीपैकी चारशे जणांना घरी पाठविण्यात आले आहे.
 आतापर्यंत ३२१ जणांचे घेतले स्वॅब
कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यापासुन येथील उपजिल्हा रुग्णालयात एक हजार ५५६ व्यक्तींची तपासणी झाली त्यात ३२१ व्यक्तींचे स्वॅब तपासणी साठी पाठविण्यात आले होते त्यापैकी ३०६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर पंधरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एकाचा अहवाल मुंबईहुनच पॉझिटिव्ह आला होता. प्रारंभी २० एप्रिलला बाधित तीन जणांना कालावधीपूर्ण झाल्यानंतर दुसरा स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज देण्यात आले होते.तब्बल दिड महिन्यानंतर १३जण बाधित आले असल्याने कालावधी पूर्ण केल्यानंतर १२जणांस तर बुधवारी उर्वरीत एकास डिस्चार्ज दिल्याने तालुका कोरोनामुक्त झाल्याने अखेर उमरगेकरांना दिलासा मिळाला आहे.
 
Top