उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
कोरोना रोगामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन उस्मानाबाद पंचायत समिती सदस्य गजेंद्र राजेंद्र जाधव यांनी आपल्या मिळणाऱ्या पंचायत समितीच्या मानधनाच्या रकमेतून डिजिटल तापमान तपासणी यंत्रे ग्रामपंचायत वडगाव गावातील ग्रामस्थाच्या सुरक्षितेसाठी खरेदी करून वडगावचे युवानेते अंकुश मोरे,पंचायत समिती सदस्य गजेंद्र राजेंद्र जाधव यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका लकडे मॅडम व दारफळकर मॅडम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाच्या प्रतिबंधक उपाययोजनांसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी लाँकडाऊनमुळे शहरात जाता येत नसल्यामुळे येथिल ग्रामस्थांची अडचण ओळखून पंचायत समिती सदस्य गजेंद्र राजेंद्र जाधव यांच्या या निर्णयाचे ग्रामस्थांकडून कौतुक व्यक्त केले जात आहे.या डिजिटल तापमान तपासणी यंत्राद्वारे गावातील गावकरी तसेच गावाबाहेरून आलेल्या व होम कॉरंटाइन केलेल्या व्यक्तीची तपासणी करण्यासाठी उपयुक्त आहे जेणेकरून तपासणी करताना आरोग्य सेविका व गावकरी यांचा संपर्क होत नसल्याने कोरोना रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून खबरदारी म्हणून या यंत्राद्वारे केलेल्या तपासणीची नोंद ठेवण्यात येणार आहे पंचायत समिती सदस्य गजेंद्र जाधव यांनी दिली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य जयराम मोरे,सुरेश मुळे,सुरेश जानराव,लक्ष्मीकांत हजारे,राजेंद्र जाधव,आण्णा पांढरे,विश्वजीत गुरव,बाळासाहेब मोरे,आरोग्य सेविका लकडे मॅडम,दारफळकर मॅडम,उपस्थत होते.
 
Top