उस्मानाबाद /प्रतिनिधी -
उस्मानाबाद तालुक्यातील वानेवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आल्याच्या पार्श्वभूमीवर गावास उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ कैलास घाडगे-पाटील यांनी भेट देऊन प्रशासनामार्फत केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली.
शिवसेना पक्षामार्फत गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना आर्सेनिक अल्बम-30 या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या, मास्क, सॅनिटायझर चे वाटप करण्यासाठी सुपूर्द करण्यात आले. आयुष्य मंत्रालयाने प्रमाणित केलेल्या रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम-30 या गोळ्याचा वापर कसा करावा तसेच येणाऱ्या काळात कोरोना बाधित रुग्ण प्रति कोणताही भेदभाव न ठेवता त्याला परत मूळ प्रवाहात आणण्यासाठी मानसिक आधार व बळ द्या, वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, महसूल अधिकारी यांनी सतर्क रहावे अशा सूचना दिल्या. तसेच ग्रामस्थांनी प्रशासन मार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सतिषकुमार सोमाणी, सरपंच प्रतिभाताई सरवदे, पोलिस पाटील मनिषाताई घेवारे, उपसरपंच प्रमोद उंबरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मेनकुदळे मॅडम, गणेश गाढवे, ज्ञानेश्वर जाधव, गणेश घेवारे, ग्रामसेवक, तलाठी तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top