उस्मानाबाद / प्रतिनिधी-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील  यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, राष्ट्रवादी भवन बीड येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख  यांच्या हस्ते  आदित्य जीवनराव गोरे यांना उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती पञ देऊन नियुक्ती करण्यात आले आहे.
 आदित्य जीवनराव गोरे यांना उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये  जलसंधारण व ग्रामविकास क्षेञामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामामुळे मिळालेली लोकप्रियता तसेच पक्षाचे विचार विकास कामांच्या माध्यमातून गाव खेड्यापर्यंत पोहचविल्या मुळे   त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 या नियुक्ती मुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.व त्यांच्यामध्ये  आनंदाचे वातावरण आहे. या निवडीमुळे  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भुम परंडा वाशी मंतदारसंघाचे मा. आ. राहुल भैय्या मोटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे  अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दुरध्वनी द्वारे अभिनंदन व कौतुक केले आहे. तसेच महाराष्ट्रातुन व जिल्ह्यातुन प्रदेश पदाधिकारी ,जिल्हा पदाधिकारी व सर्वच स्तरावरुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 
Top