उस्मानाबाद / प्रतिनिधी
खरिप हंगाम 2020 मधिल दुबार पेरणीसाठी पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत व खताचा मागणी प्रमाणे पुरवठा करावा याबाबत आज कृषिमंत्री मा.ना.श्री दादाजी भुसे साहेब जिल्हा दौऱ्यावर आले असता निवेदना द्व्यारे खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ कैलास घाडगे-पाटील यांनी करण्यात आली.
 चालू खरीप हंगामात उस्मानाबाद जिल्हयात १३४ मिमि पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्याचे प्रमुख पिक सोयाबीन आहे . जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीसाठी महाबीज व अनेक कंपनीचे बियाणे वापरले आहे. मात्र पेरणी झालेल्या क्षेत्रा पैकी जवळपास 50 टक्के क्षेत्रामध्ये पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या अनेक तक्रारी कृषी विभागाकडे येत आहेत. त्या अनुषंगाने अशा सर्व शेतकऱ्यांच्या न उगवलेल्या शेती क्षेत्राचे पंचनामे करण्याचे कृषी विभागाला आदेश द्यावे.
पेरणीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये खत आणि बियाणे साठी पैसा खर्च केलेला आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्रात आणि देशभरात कोरोनाचे वातावरण असताना शेतकरी देखील आर्थीक अडचणीत सापडलेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दुबार पेरणी करणे शक्य होणार नाही अशा ज्या ठिकाणी सोयाबीनचे बियाणे उगवले नाही अशा सर्व शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावे व त्या शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत नुकसान भरपाई देण्याची तात्काळ शासनाने कार्यवाही करावी.
   सध्या बाजारपेठांमध्ये लॉकडाउन मुळे खते ही मागणी प्रमाने उपल्बध होत नसल्याने खताचा तुटवडा , टंचाई निर्माण झाली आहे तरी आपल्या स्तरावरून खतांचा पुरवठा मागणी मुबलक प्रमाणात करण्यात यावा. अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ कैलास घाडगे-पाटील यांनी आज कृषिमंत्री मा.ना.श्री दादाजी भुसे साहेब जिल्हा दौऱ्यावर आले असता निवेदना द्व्यारे करण्यात आली.
 
Top