उस्मानाबाद दि.२६ (प्रतिनिधी) - कोरोना विषाणूंच्या भयावह महासंकटाचा सामना संपूर्ण जग करीत आहे. राज्य सरकार देखील सर्वांना बरोबर घेऊन यावर मात करून या संकटातून लवकरात लवकर आपल्याला बाहेर पडायचे आहे असे स्पष्ट  करत उस्मानाबादचे मेडीकल काॕलेज कधी सुरु होईल पञकारानी विचारलेल्या प्रश्नाला  माञ मेडीकल काॕलेज उभारणीस जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ येथेही लागेल असा प्रकारचे गोलमोल उत्तर  राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक व जिल्ह्याचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिले
 जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ  जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, कैलास घाडगे - पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, पोलीस अधीक्षक‌ राजतिलक रोशन, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, प्रकाश आष्टे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना देशमुख म्हणाले की उस्मानाबाद जिल्ह्यातील जे रुग्ण कोरोना या आजारामुळे दगावले आहेत त्यांना इतर आजारही असल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे कोरोना विरुध्दचा  हा लढा जोपर्यंत औषध येत नाही तोवर सुरूच राहणार असल्याने प्रत्येकांनी सुरक्षा चे पालन करणे काळाची गरज आहे तसेच मास्क  सॕनिटायझर व इतर औषधे याची कुठलीही कमतरता पडणार नाही कारण आपल्याकडे आवश्यक ते पेक्षा जास्त औषधे उपलब्ध आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी औषधांचा साठा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून होमिओपॅथी आयुर्वेदिक युनानीच्या आर्सनिक अल्बमा गोळ्या असून त्या उपयोगात आणाव्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले यासाठी जिल्हा तालुका व गाव स्तरावर जास्त फोर्स पथके तयार करण्यात आली असून खाजगी डॉक्टर सुद्धा या सेवेसाठी लागल्यास घ्यावे लागल्यास तशा सूचना देखील मी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या आहेत असे सांगून ते म्हणाले की रुग्णसेवा देताना मनुष्यबळ कमी पडणार नाही तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभ सर्वांना व्हावा यासाठी त्यामध्ये सर्वांचाच समावेश करण्यात आलेला आहे उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय रुग्णालय उभा करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे विशेष म्हणजे आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाने या काळामध्ये वरून च्या सेवा देण्यासाठी आवश्यक असणारे आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे भरण्याचा निर्णय घेऊन राज्यातील 25 हजार जागांची भरती करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे रिक्त जागा राहणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला
 
Top