तेर( प्रतिनिधी)
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रथम वर्षपुर्ती निमित्त जिल्हा भारतीय जनता पक्षाचे वतीने घर संपर्क अभियानाचा शुभारंभ  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते तेर येथे करण्यात आला.
शनिवार दि.13 जून रोजी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे माजी सैनिक व प्रतीष्ठीत नागरीक यांना वर्षभरातील कार्याचा आढावा असणारे पत्रक घरोघरी जाऊन वितरीत करण्यात आली.
प्रातीनिधीक स्वरूपात माजी सैनिक बबनराव जाधव व जेष्ठ नागरिक देविदास काळे यांना पत्रक देण्यात आले.यावेळी भा.ज.पा.चे.जिल्हाध्यक्ष नितीन काळे डॉ. आबेडकर साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव नाईकवाडी , तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी ,प्रवीण साळुंखे  ,मज्जित मनियार,गणेश फंड,सुधाकर गुंड  ,उमेश राऊत उपस्थित होते.
 
Top