उस्मानाबाद / प्रतिनिधी
दिनांक 1 जुलै 2020 ते 15 जुलै 2020 या कालावधीत वृक्षलागवड पंधरवाडा साजरा करण्यात येत असून श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे जिल्हाधिकारी उस्मानाबाद श्रीमती रुपाली आवले अपर जिल्‍हाधिकारी, श्री. राजेंद्र खंदारे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. एम. आर. गायकर विभागीय वन अधिकारी. श्री. महेद्र कुमार कांबळे, जिल्हा समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्री. रामेश्वर रोडगे उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद श्री. गणेश माळी तहसीलदार उस्मानाबाद, सर्व नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद येथे दिनांक 25 जुलै 2020 रोजी श्रमदान करण्यात आले. सदर श्रमदाना करिता जिल्हाधिकारी कार्यालय, वनविभाग, तहसील कार्यालय उस्मानाबाद येथील सर्व अधिकारी /कर्मचारी तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील कर्मचारी व विद्यार्थी यांनी महाश्रमदानातून 446 खड्ड्यांचे खोदकाम करण्यात आले.
 तसेच यापुढील श्रमदानाचा कार्यक्रम शासकीय तंत्र शिक्षण प्रशाला देशपांडे जवळ उस्मानाबाद येथे शनिवारी दिनांक 27 जून 2020 रोजी होणार असून सदर श्रमदानात उस्मानाबाद मधील स्वयंसेवी संस्था व महसूल विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. असे तहसीलदार उस्मानाबाद यांनी कळवले आहे
 
Top