उस्मानाबाद / प्रतिनिधी|
अखिल भारतीय मराठी नाटय परिषद, शाखा उस्मानाबाद च्या वतीने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईचे अध्यक्ष  प्रसाद कांबळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उस्मानाबाद तालुक्यातील विविध कलाक्षेत्रातील 111 कलावंतांना अन्नधान्याचे किट देवून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच मा. प्रसाद कांबळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. तरी सद्यस्थितीत कोव्हीड-19 या विषाणुमुळे देशात व राज्यात लॉकडाऊनची स्थिती असल्या कारणाने उस्मानाबाद जिल्हयातील कलावंतांवर उपासमारीची वेळ आल्याने सदर कार्यक्रम अखिल भारतीय मराठी नाटय परिषद शाखा उस्मानाबादच्या वतीने श्री विशाल शिंगाडे, अध्यक्ष तथा नियामक मंडळ सदस्य मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
तसेच कोव्हीड-19 या महामारीमुळे उस्मानाबाद जिल्हयातील आराधी, गोंधळी, बँडवाले, नंदीवाले, वाघ्या, मुरळी, पोतराज, पिंगळा, पांगूळ, हालगीवाले, डफवाले इत्यादी सर्व कलावंतांसाठी किट मिळण्यासाठी देशाचे नेते  शरद पवार , मुख्यमंत्री   उध्दवजी ठाकरे, सांस्कृतिक कार्य मंत्री  अमित देशमुख,  संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना देखील कलावंतांना किट मिळण्यासाठी निवेदन सादर केले आहे.   कार्यक्रमावेळी उपाध्यक्ष सागर चव्हाण, तालुकाध्यक्ष खंडेराव मुळे, सहकार्यवाह सुगत सोनवणे, सल्लागार राजेंद्र अत्रे, सहकार्यवाह धनंजय कुलकर्णी, नाटय परिषदचे कार्यकारणी सदस्य सत्यजीत माने, सुहास झेंडे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित राहून सदर कार्यक्रम पार पाडला. 
 
Top