उस्मानाबाद/ प्रतिनिधी
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना विना अनुदानित, कायमविना अनुदानित व स्वयं अर्थसाहाय्याच्या सर्वशाळांमध्ये 25 टक्के प्रवेशाची प्रक्रिया दिनांक 24 जून 2020 पासून सुरु होत आहे.
   शाळेने करावयाची कार्यवाही
शाळेला आर. टी. ई. पोर्टलवर त्याच्या लॉगीनला विद्यार्थ्यांची नावे व मोबाईल नंबर देण्यात आलेले आहेत. शाळेने आपल्या सोईनुसार विद्यार्थ्यांना बोलावून प्रवेशाची प्राथमिक कार्यवाही करावी. प्रवेशाचे वेळा पत्रक गेटवर लावावे. प्रवेशासाठी मुळ कागदपत्रे व
छायांकीत प्रत घ्यावी. प्राथमिक तपासणी करुन योग्य असल्यास नावापुढे ऑनलाईन नोंद करावी.तसेच पालकाकडून अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करावे. व ती नोंद करुन पालकांना परत करावे. पालकाकडून हमी पत्र घ्यावे. शाळेने पडताळणी समितीचा दिनांक व वेळ घेऊन या प्रवेशाची कागद पत्रेता पासून प्रवेश निश्चित करावेत.कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील पालकांना निर्बंध शिथिल झाल्यानंतर बोलविण्यात यावे. शाळा कोरोना प्रतिबंधक क्षेत्रात असल्यास शाळांनी अटी शिथिल झाल्यावर प्रवेशाची कार्यवाही करावी. चुकीचे प्रवेश होणार नाही,याबाबत योग्यती दक्षता घ्यावी.
• पालकांनी करावयाची कार्यवाही :-
शाळेच्या प्रवेशाबाबत मेसेज आल्यानंतर मूळ कागदपत्र व छायाकिंत प्रत घेऊन शाळेत जावे. तात्पुरता प्रवेश घ्यावा. व हमी पत्र शाळेस दयावे. प्रवेशासाठी पालकास त्या दिनांकास उपस्थित न राहता आल्यास पुढील दिनांकाची मागणी करावी. शाळेच्या मेसेजवर अवलंबून न राहता आर. टी. ई. पोर्टलवर अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाच्या दिनांकाची खात्री करावी. आर. टी. ई. पोर्टलवरील सुचनांचे पालन करावे लागेल. कागदपत्रे चुकीचे आढळून आल्यास व पोर्टलवरील माहिती चुकीची भरल्याचे आढळून आल्यास हमी पत्रानुसार कार्यवाही करण्यात येईल. शाळेच्या प्रवेशाबाबत मेसेज, फोन, ऑनलाईन पोर्टलवर प्रवेशाचा दिनांक दिसून आल्यास त्याच दिनांकास शाळेत जावून प्रवेशाची कार्यवाहीकरावी.
• पडताळणी समितीने करावयाची कार्यवाही :-
प्रवेशाबाबत देखरेख करावी. शिक्षण संचालकांच्या परिपत्रकाप्रमाणे शाळा स्तरावरील कार्यवाही बाबत खात्री करावी. शाळेला व पालकांना मार्गदर्शन करावे, प्रसिध्दी दयावी. प्रत्येक शाळेला कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिनांक व वेळ देण्यात यावा. कागदपत्राची पडताळणी करुन प्रवेश निश्चित करावे. तशी नोंद ऑनलाईल पोर्टलवर करावी. पडताळणीमध्ये कागदपत्रे चुकीची आढळून आल्यास किंवा पालकांनी ऑनलाईन पोर्टलवर चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास प्रवेश रद्य करणे, फौजदारी कार्यवाही करणे, शासकीय प्रतिपूर्तीस बालकास अपात्र करणे, त्यामुळे पालकाने शाळेची पूर्ण फी भरणे यापैकी एक किंवा एकापेक्षा जास्त शिक्षा प्रकरणांचे गांर्भीय लक्षात घेऊन करण्यात यावे.
आर. टी. ई. मधून ज्या पाल्याचे नंबर लागलेले आहेत. त्या पालकांनी तात्काळ शाळेशी संपर्क साधून प्रवेशाची कार्यवाही करावी, असे आवाहन श्रीमती रोहिणी कुंभार शिक्षणाधिकारी (प्राथमिक),जि.प.उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top