उस्मानाबाद / प्रतिनिधी-
आपल्या आसपास कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला तरी देखील नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे. या संकटातून आपण नक्कीच बाहेर पडू विश्वास ठेवा.
सिंदफळ ता.तुळजापूर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढल्याची माहिती समजताच सकाळी सिंदफळ येथे भेट देवून नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.
गावातील एका व्यक्तीला आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी ते सोलापूर येथून गावाकडे परत आले. त्यांना परत बरे वाटत नसल्याने सोलापुर येथे  उपचारासाठी दाखल केले गेले. तेथे त्यांची कोरोना टेस्ट घेतली असता ती पॉझिटिव्ह निघाली.
या अनुषंगाने रुग्णाच्या संपर्कात आलेल्या जवळपास २५ जणांना कॉरंटाईन करण्यात आले आहे. गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाकडून रुग्ण वास्तव्यास असलेला भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला गेला आहे. या ठिकाणी भेट देवून गावातील लोकप्रतिनिधी, नागरिक, संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच गावातील नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
याप्रसंगी तुळजापूरचे तहसीलदार श्री.तांदळे, गट विकास अधिकारी श्री.प्रशांतसिंह मरोड, आरोग्य अधिकारी श्रीमती माधुरी डोंगरे, तुळजापूरचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी, सरपंच कुंतफळे, ग्रामसेवक रेड्डी, श्री.अभिजित दणके तसेच आशा स्वयंसेविका व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
 
Top