तुळजापूर/प्रतिनिधी- 
शिवराज्याभिषक सोहळ्याचे औचीत्य साधुन कोरोना महामारी पार्श्वभूमीवर निर्माण झालेली रक्तटंचाई वर मात करण्यासाठी  खास  तुळजापूर मिञ परिवाराचा वतीने  शासणाच्या निर्णयाचे पालन करीत आयोजित रक्तदान शिबीरात 102 शिवप्रैमीनी रक्तदान करुन समाजिक बाधिलकि जोपासत शिवराज्य अभिषेक सोहळा साजरा केला.
नावासाठी नाही तर शिवरायांनसाठी हे ब्रीद वाक्य घेवुन तुळजापूर मिञ परिवार या नावाखाली येथील श्री विठ्ठल रुक्मीनी मंदीरात आयोजित या रक्तदान शिबीरास नगरसेवक विशाल रोचकरी, भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष तथा तुळजापूर विकास प्राधिकरण सदस्य  नगरसेवक सुनिल रोचकरी यांनी येथे भेट देवुन या शिवप्रैमींचे कौतुक केले. प्रथम छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्वयस्फुर्तीने शिवप्रैमींनी येवुन रक्तदान केले. हा  उपक्रम यशस्वी यशस्वी करण्यासाठी  विश्वेश पाठक, विजय मगर,  सचिन साखरे, सुरज जगताप, राजेश गायकवाड,दत्ता वाघमारे, रवी महामुनी, गणेश कोठावळ, राहुल साळुंके, प्रणव निकते, विशाल शेटे आदींनी परिश्रम घेतले.

 
Top