उस्मानाबाद /प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत दारू विक्री करण्यास परवानगी मिळाली असून केवळ मद्य पिण्याचा परवाना असलेल्या परवानाधारकांना दारू विक्री करता येणार आहे, ज्यांच्याकडे परवाना नाही त्यांना दारू विकता येणार नाही शिवाय त्यांना दारूच्या रांगेत सुद्धा उभे राहता येणार नाही, दारू विक्री करताना कोरोनाबाबत असलेल्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांनी दिली.
परवाना नसलेल्या मद्यप्रेमींनी दुकानात व त्या परिसरात गर्दी करू नये त्या ऐवजी excise विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन मद्य पिण्याचा ऑनलाइन परवाना काढुन घ्यावा, परवाना तात्काळ दिला जात आहे. विभागाकडून मॅन्युली परवाने दिले जाणार नसून व ते ग्राह्य धरले जाणार नसल्याचे राऊत यांनी सांगितले

 
Top