उस्मानाबाद /प्रतिनिधी:-
उस्मानाबाद येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने  राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक प्रदेश अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन   शेरखाने यांच्या माध्यमातून १५१ गरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्य वितरित करण्यात आले.यावेळी  सर्व जाती धर्मातील गरजूंना मदत करण्यात आली हे विशेष.तसेच यावेळी योग्य तो सोशल डीस्टन्स राखून,सर्वांनी मास्क वापरून व सुरक्षात्मक उपाययोजना उपयोगात आणत हे वितरण केले .
ही मदत वितरित करतेवेळी माजी नगरसेवक सुरेश   शेरखाने, रा.च.म.चे जिल्हाध्यक्ष अॅड. गणपती कांबळे, जिल्हा सचिव तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन सं समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष बबनराव वाघमारे  , राज्य कार्यकारिणी सदस्य धोंडीराम वाघमारे, देविदास शेरखाने, अनिल शेरखाने, पद्माकर शेरखाने, दत्ता चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top