नळदुर्ग /प्रतिनिधी-
आयशर वाहनातून बेकायदेशीररित्या 31 लहान-मोठे जनावरे घेऊन जाणाऱ्या दोघांविरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 4 लाख 58हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खानापूर चेक पोस्टवर पोलीस उपनिरीक्षक अशोक पिंपळे हे 17 मे रोजी पहाटे 2 वाजता लाॅकडाऊन पेट्रोलिंग करीत असताना  सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील आसिफ कुरेशी वय 40 वर्ष व आयुब कुरेशी वय 25 वर्ष  हे दोघे आपल्या ताब्यातील MH-13 AX- 4050 या ईटकरी रंगाच्या आयशर ज्याच्या काचावर अत्यावश्यक वस्तु वाहतूक व पुरवठा असे कागदी चिटी चिटकलेल्या टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोमध्ये 31 लहान-मोठे गोवंशीय व म्हैस
वंशीय जनावरे त्यापैकी काही जनावराच्या तोंडाला निळ्या रंगाचे चिकट टेप ने बांधलेल्या अवस्थेत मिळून आले. वरील दोघांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचे आदेशाचा भंग करून जनावरे कटाई साठी घेऊन जात असताना मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातील 31 जनावरे व टेम्पो असा एकूण 4 लाख 58 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत  पोलीस उपनिरीक्षक अशोक पिंपळे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून  गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित मस्के हे करीत आहेत.
 
Top