वाशी /प्रतिनिधी-
कोरोना विषानुच्या पार्श्वभुमीवर खरीप हंगामात शेतकर्‍यांना खते, बियाणे बांधावर पोहोचविण्यासाठी कृषि विभागाने नियोजन केले आहे. कोरोना विषानुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे हाच पर्याय आहे. आगामी खरीप हंगामासाठी पूर्वमशागत करून आर्थिक जुळवाजुळव करून खते व बियाणे खरेदीसाठी बळीराजा सज्ज झाला आहे. कोरोना रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने संपुर्ण लॉकडाउन आदेश जारी केले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची गैरसोय होऊ नये व शेतकर्‍याला बि-बियाणे व खते याची टंचाई भासु नये, यासाठी शेतकरी गटामार्फत बांधावर खत वाटप योजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार वाशी येथे गटामार्फत खते व बियाणे वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. कोरोना या विषानुच्या फैलावामुळे शेतकर्‍याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. ऐन रब्बी हंगामात कोरोना ची साथ आल्याने रब्बी हंगामातील काढलेले उत्पादन घरात पडुन आहे. सध्याच्या कोरोना पार्श्वभुमीवर कृषि सेवा केंद्रावर गर्दी पडु नये. विषानुचा फैलाव होऊ नये. खते व बियाणे यांची टंचाई भासुन खरीप पेरणीच्या काळात शेतकर्‍यांची धावपळ होऊ नये यासाठी कृषि विभाग प्रयत्नशील आहे. वाशी तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारीही बांधावर खत वाटप योजना यशस्वी करण्यासाठी गावागावात जाऊन बैठका घेत आहेत. गावातील शेतकर्‍यांनी शेतकरी गटामार्फतच  यापुढे खते व बियाणे खरेदी करण्याचे आवाहन कृषि विभागाकडुन करण्यात आले. यावेळी जिल्हा कृषि विकास अधिकारी श्री टि.जे.चिमनशेट्टी साहेब, तालुका कृषि अधिकारी श्री संतोष कोयले, कृषि पर्यवेक्षक श्री रामदास शिंदे, कृषिसहाय्यक श्री दिनेश लोंढे, नवनाथ गिरी, कृषि मित्र श्री अंगद चोथवे, नृसिंह कृषि सेवा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री गणेश गपाट यांच्यासह बल्लवऋषि शेतकरी गटातिल शेतकरी उपस्थित होते

 
Top