कळंब/प्रतिनिधी -
महाराष्ट्र  राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेश चिटणीस श्री भक्तराज दिवाने यांची कन्या चि.सौ.का. प्रियंका व  चि.गोविंद जाधव  यांचा शुभविवाह  दि.१२ मे २०२० रोजी सकाळी ११ वाजता  शेलगाव दिवाने या ठीकाणी संपन्न झाला. या प्रसंगी भक्तराज दिवाने यांनी  मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी ५१ हजार रुपयाचा धनादेश खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर आ .कैलास दादा पाटील यांच्या कडे सुपुर्त करण्यात आला.
तसेच कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने सौ.प्रियंका हीस ११ हजार रु.शुभमंगल कन्यादान देण्यात आले या वेळी बाळकृष्ण तांबारे ,तालुका अध्यक्ष दत्तात्रय पवार , पत्रकार बालाजी अडसुळ ,मुख्याध्यापक रविंद्र शिनगारे यांच्यासह ५० नागरीक उपस्थित होते.
 
Top