उस्मानाबाद  /प्रतिनिधी-
 उस्मानाबाद तालुक्यातील चिखली या गावचा रहिवासी असलेल्या आणि सध्या सोलापूर येथे सेवेत असलेल्या आणि नुकतीच सुट्टी संपवून सोलापूर येथे गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
 याबाबत माहिती अशी की, चिखली येथे हा पोलीस कर्मचारी २४ एप्रिल च्या दरम्यान सुट्टीनिमित्त गावी आला होता. त्यानंतर तो सोलापूर येथे गेल्यानंतर त्याची चाचणी घेतली ती पॉझिटीव्ह आली आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक राजाभाऊ गलांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना उस्मानाबाद येथे तपासणीसाठी आणण्यात आले आहे असे सांगितले. तत्पूर्वी चिखली हे गाव सिल केले असून प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याची माहिती महिती मिळाली.
डॉ. गलांडे यांनी लोकराज्यशी बोलताना सांगितले की, सदर माहिती मिळताच पोलिस कर्मचाऱ्याचे आई-वडील व भाऊ-भावजयी यांना त्वरीत जिल्हा शासकीय रूग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांचे स्वॉबचे नमुने सोलापूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. सदरचा अहवाल उद्या संध्याकाळी उशीरापर्यंत येण्याची शक्यता असल्याचे सांगितले. दरम्यान सदर पोलिस कर्मचाऱ्याच्या संपर्कात कोण-कोण आले आहेत, याची माहिती घेऊन अन्य लोकांची तपासणी करण्यात येणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हयाच्या सिमा कडेकोट बंद करणे आवश्यक 
उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाग्रस्त रूग्ण ही नसल्यामुळे जिल्हा ग्रीन झोन मध्ये आला होता. उस्मानाबाद जिल्हयाच्या भोवताली नगर, बीड, लातुर, सोलापूर हे ऑरेज व रेड झोन मधील जिल्हे असल्याने उस्मानाबाद जिल्हयास धोका होण्याची शक्यता आहे, जिल्हा प्रशासनाच्या जिल्हयाच्या सिमा लॉक केल्या असल्यातरी अजून अतीदक्षता घेणे गरजेचे आहे. 
 
Top