तुळजापूर/प्रतिनिधी-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या  मंदीरात भाविकांना कोरोना विषाणू संसर्गजन्य साथ पार्श्वभूमीवर प्रवेश बंद केला असल्याने सध्या उत्पन्नात घट असुन महिन्याला सुमारे ऐक कोटी रुपये खर्च सुरु असल्याची माहीती मंदीर समितीने दिली.
श्रीतुळजाभवानी मंदीर कोरोना पार्श्वभूमीवर ऐक महिन्यापुर्वी पासुन  भाविकांना मंदीरात प्रवेश बंद असुन  फक्त नित्योपचार पुजा मोजक्या च लोकांच्या उपस्थितीत  पार पडल्या जातात सध्या श्रीतुळजाभवानी मंदीरात अठ्ठावन कर्मचारी कार्यरत आहेत. श्रीतुळजाभवानी मंदीर बंद असल्याने भाविकांन कडून देणगी मिळणे बंद झाले आहे तसेच भाविकांच्या वतीने  केल्या जाणाऱ्या दहीदुधपंचामृतअभिषेक पुजा श्रीखंड तसेच दहीदुध सिंहासन पुजा गोंधळ जावळ सह अन्य पुजा बंद असल्याने यातुन मिळणारे प्रमुख अर्थिक उत्पन्न बंद झाले आहे दर्शन बद असल्याने  व्हीआयपी दर्शन मधुन मिळणारे उत्पन्न ही ठप्प झाले आहे. मंदीर समिती ला आँनलाईन देणगी मधुन दोन लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाले असले तरी खर्च माञ कोटीचा घरात असल्याने कोरोना चा परिणाम देवदेवतांचा उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात झाला आहे.
आँनलाईन माध्यमातून  दोन लाख देणगी प्राप्त !
श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांना प्रवेश चालू असतो तेव्हा उत्पन्न सुरु होते माञ भाविकांनाच दर्शनार्थ प्रवेश बंद असल्याने मंदीर समितिला ऐक रुपया उत्पन्न सध्या मिळत नाही
परंतु आँनलाईन दैणगीतुन माञ या महिन्यात दोन लाख रुपये देणगी मिळाली आहे
 
Top