उस्मानाबाद /प्रतिनिधी-
लाॅकडाऊनमुळे उस्मानाबाद शहरात, अनेक परप्रांतीय विद्यार्थी हे नोकरीच्या तीन महिन्याच्या ट्रेनिंगसाठी आंध्रप्रदेश,तेलंगणा,केरळ,राज्यस्थान,उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेशमधुन आले होते परंतु कोरोनाचा पादुर्भाव टाळण्यासाठी देशात लाॅकडाऊन व संचारबंदीने या विद्यार्थ्यावर उपासमारीचे संकट कोसळले आहे.यातील कांही विद्यार्थ्यांना उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने शिंगोली येथील आश्रम शाळेत, निवारा केंद्रात ठेवले आहे.तर यातील जवळ,जवळ अडीशे परप्रांतीय विद्यार्थी उस्मानाबाद शहरातील,  सांजा रोड,बायपास परिसरात विविध ठिकाणी भाड्याने राहात आहेत.या विद्यार्थ्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळे होते.या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी,शहरातील शरदचंद्रजी पवार अभिष्टचिंतन सोहळा समितीचे कार्यकर्ते धावले. यासाठी शेखर शांतीनाथ घोडके व त्यांच्या टिमने सांजा रोड,बायपास येथे  दि.१७ एप्रिल पासून, अन्नछञालय उघडले व या माध्यमातून दररोज अडीशे विद्यार्थ्यांना सकाळचे जेवण, शिवभोजन योजनेतून व राञीचे एक वेळेसचे जेवण शहरातील दानशूर व्यक्तीकडून दिले जाते.
काल दि.४/५/२०रोजी,सायंकाळी साडेसात वाजता अडीशे विद्यार्थ्यांना जेवण प्रा.डी.एम.शिंदे(समाजशास्ञ विभाग प्रमुख रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,उस्मानाबाद )यांनी देवून माणुसकी जपली व आपली दानशूरता दाखवली.हे जेवण वाटप करत आसतांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून दिले गेले व विद्यार्थ्यांनीही शिस्तीचे पालन करत जेवण घेतले.
यावेळी प्रा.डी.एम.शिंदे,त्यांच्या पत्नी सौ.पुष्पाताई शिंदे यांनी या परप्रांतीय विद्यार्थ्यांना स्वत:अन्नदान वाटप करून माणुसकीचा जिव्हाळा जपला  विद्यार्थ्यांना धीर दिला. यावेळी शेखर शांतीनाथ घोडके,प्रा.राजा जगताप,प्रा.डाॅ.एल.व्ही.भरगंडे,प्रा.डाॅ.बालाजी गुंड,प्रवर्तन जगताप व शरदचंद्रजी पवार अभिष्टचिंतन सोहळा समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.यातील १००विद्यार्थी आज राञी, त्यांच्या गावाकडे सर्व नियमाचे पालन व पूर्तता करत  परतणार असल्याची माहिती शेखर घोडके यांनी दिली.

 
Top