नळदुर्ग /प्रतिनिधी-
 कोरोनाच्या संकटात एक राष्ट्रीय कार्य म्हणुन नळदुर्ग येथील जय हिंद तरुण गणेश मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे असे सेवानिवृत्त आदर्श शिक्षक श्री शिवाजीराव वऱ्हाडे यांनी म्हटले आहे. मंडळाने आयोजीत केलेल्या रक्तदान शिबिरास शहरांतील रक्तदात्यांनी विशेष करून महीला रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
या रक्तदान शिबिरात ८१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.जगभर थैमान घातलेल्या कोरोनामुळे महाराष्ट्रात मोठयप्रमानात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य विभागाने राज्यांतील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतीसाद देत नळदुर्ग शहरांतील व्यासनगर येथील जय हिंद तरुण गणेश मंडळ व सोलापुर येथील Y4D यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२८ मे रोजी नळदुर्ग येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. व्यासनगर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराचे उदघाटन नगरसेवक नितीन कासार, महालिंग स्वामी विनायक अहंकारी नगरसेविका सुमनबाई जाधव व सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक अमृत पुदाले,सुधीर हजारी, पत्रकार विलास येडगे,सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव वऱ्हाडे, भाजपाचे शहर सरचिटणीस सागर हजारी, पत्रकार उत्तम बनजगोळे, लतीफ शेख, भगवंत सुरवसे, हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज,स्वातंत्र्यवीर सावरकर व आई तुळजाभवानी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी बोलताना सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव वऱ्हाडे यांनी म्हटले की सध्या समाजापुढे कोरोना या वैश्विक महामारीचे फार मोठे संकट उभे टाकले आहे.कोरोनाच्या संकटामुळे आज संपुर्ण जग हादरून गेले आहे. कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी जय हिंद तरुण गणेश मंडळाने आयोजीत केलेले रक्तदान शिबिर हे एकराष्ट्रीय कार्य असुन जय हिंद तरुण मंडळाचा हा आदर्श घेऊन शहरांतील इतर मंडळांनीही रक्तदान शिबिर घ्यावे असे आवाहन शिवाजीराव वऱ्हाडे यांनी केले.
यावेळी नगरसेवक विनायक अहंकारी यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना मंडळाचे कौतुक केले. या रक्तदान शिबिरात नगरसेवक नितीन कासार,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते गणेश मोरडे, शिवसेनेच्या मिडिया सेलचे शहर प्रमुख सुनिल गव्हाणे, शिवाजीराव वऱ्हाडे,रणजीत डुकरे, सौ.पानसरे,सौ. रेखा वऱ्हाडे, सौ. राधिका गायकवाड, सौ. प्रा. ढोकळे यांच्यासह अनेक रक्तदात्यांनी उस्फुर्तपणे रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदविला. हे रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अमोल मेंडके, नवल जाधव, विनिल जांभळे, अमोल वऱ्हाडे, सचिन गायकवाड, संदीप गायकवाड, शंकर भाळे,गणेश पांचाळ, बालाजी मोरे यांच्यासह मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले. यावेळी गणेश मोरडे यांनी रक्तदात्यांना मोफत मास्कचे वाटप केले तर अमोल वऱ्हाडे यांनी रक्तदात्याना चहा--बिस्कीट दिले. सोशल डिस्टनसिंगचे नियमपाळुन हे रक्तदान शिबिर घेण्यात आले.
 
Top