उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 जिल्ह्यातील तूर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तूर खरेदीसाठी दिनांक 30 एप्रिल, 2020 पर्यंत अंतिम मुदत होती. तसेच हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत 30 एप्रिल, 2020 होती.
आता शासनाने दिनांक 31 मे, 2020 पर्यंत तूर खरेदीस मुदतवाढ आहे. तसेच हरभरा पिकाचे ऑनलाईन नोंदणीसाठीही  दिनांक 31 मे, 2020 पर्यंत कालावधी  वाढवून दिलेला आहे.
 जिल्ह्यातील 11 खरेदी केंद्रावर तूर व हरभरा खरेदी सुरु करण्यात आलेली आहे. आज अखेर जिल्ह्यात तूर खरेदी 12 हजार 534 क्विंटल व हरभरा खरेदी  634  क्विंटल झालेली आहे.
नोंदणीकृत शेतकरी बांधवांनी तूर विक्रीसाठी मेसेज प्राप्त झाल्यानंतर संबंधित खरेदी केंद्रावर विक्रीसाठी घेवून जावी. बरेच शेतकऱ्यांना हरभरा ऑनलाईन नोंदणी लॉकडाऊन असल्यामुळे व इतर कारणांमुळे करता आलेले नाही . त्यांनी हंगाम 2019-20 चा हरभरा पिकपेरा असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबूक प्रत, मोबाईल क्रमांक आदी माहितीसह दिनांक 31 मे, 2020 पर्यंत संबंधित सबएजंट संस्थेस नाव नोंदणीसाठी कागदपत्र स्वीकारण्यात येतील, तसेच गाव पातळीवर विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांचे सचिवांकडे हरभरा नोंदणीसाठीचे कागदपत्रे  स्वीकारण्याची सुविधा दिलेली आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटींग अधिकारी, उस्मानाबाद यांनी दिली आहे.

 
Top