कळंब (प्रतिनिधी) -
कळंब तालुका मराठी पत्रकार मंडळ कळंब तर्फे दि. 08 रोजी सुनिल मार्केट येथे पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांना मंडळाचे अध्यक्ष पत्रकार श्री. उन्मेष पाटील यांच्या हस्ते  या मास्क आणि सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांना वृत्तांकन आणि अन्न साहित्य किट वाटप करणे यासारख्या कारणासाठी बाहेर यावे लागते तेंव्हा त्यांची सुरक्षा सुद्धा महत्वाची आहे म्हणून कोरोना व्हायरस या भयानक आजार संसर्गापासून बचाव व्हावा, या उद्देशाने पत्रकार मंडळाने मास्क आणि सॅनिटायझर चे वाटप केले असल्याचे अध्यक्ष उन्मेष पाटील यांनी सांगितले, यावेळी पत्रकार मंडळाचे सचिव पत्रकार भिकाजी जाधव, शीतलकुमार घोंगडे, धनंजय घोगरे, स्फूर्ती फौंडेशन चे अध्यक्ष शिवाजी गिड्डे पाटील, मकरंद पाटील, दिनेश पौळ आदी उपस्थित होते.

 
Top