कळंब (प्रतिनिधी)
उस्मानाबाद शिवसेनेच्या वतीने कळंब तालुक्यातील डॉक्टर्स यांना एन ९५ मास्क व इतर साहित्याचे चे वाटप खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले असुन तालुक्यातील शंभर डॉक्टर्स ला या किट चा फायदा होणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वस्तरावर प्रयत्न करत आहे. या करीता पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग दिवसरात्र एक करुन काम आहे. या मध्ये खाजगी डॉक्टर सुध्दा या लढ्यात उतरलेले आहेत. ?यांची खबरदारी घेण्यासाठी धाराशीव शिवसेनेच्या वतीने एन ९५ मास्क, गॉगल व हेड कॅप असे किट तयार करण्यात आले आहे.
बनवण्यात आलेले किट उपजिल्हा रुग्णालय येथे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांच्या हस्ते प्राथनिधिक स्वरूपात काही डॉक्टरांना हे किट वाटप करण्यात आले आहे. शंभर डॉक्टर्स ला वाटप करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना शहरप्रमुख प्रदीप मेटे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब जाधवर, वैद्यकीय अधिक्षक डॉ जिवन वायदंडे, केटीएमपिए चे अध्यक्ष डॉ. अभिजीत जाधवर, डॉ. रमेश जाधवर, डॉ. रामकृष्ण लोंढे, डॉ. अजित देशमुख, डॉ निशिकांत चोपने, डॉ. शरद दशरथ, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. सचिन पवार, सुधाकर सावळे, सचिन काळे, ईश्वर भोसले आदी उपस्थित होते.