तुळजापूर /प्रतिनिधी -
एका युवतीने  कोरोना कालावधीत छञपती शिवाजी व छञपती संभाजी महाराज हे आपल्या कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेची आरती करत असतानाचा प्रसंग सुंदर रांगोळीच्या माध्यमातून रेखाटुन आपले शिवप्रेम व्यक्त केले.
तुळजापूर येथील लाईटींग डेकोशनचे व्यवसाय करणारे सुरेश बडोदकर कावरे यांची कन्या सुप्रिया सुरेश कावरे ही लहान पणापासुन शिवप्रेमी असुन तिने अनेक वेळा छञपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्ताने छञपती शिवाजी महारांजाच्या कार्यावरचा इतिहास रांगोळी तुन रेखाटला  आहे.सुप्रिया ही मेकअप आर्टीस्ट असुन तिने मेकअप आर्टीस्ट  परिक्षेत जिल्हयात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
मी शिवप्रेमी -सुप्रिया कावरे  
छञपती शिवाजी महाराज व छञपती संभाजी महाराज यांच्या अतुल्य कामगीरी मुळे  मी लहानपणा पासुन त्याच्यावर माझी श्रध्दा आहे. सध्या कोरोना असल्याने कुठलेही काम नसल्याने निवांत असताना लक्षात आले की  लवकरच येणाऱ्या छञपती संभाजी महाराज जयंती पार्श्वभूमीवर छञपती संभाजी महाराजांची रांगोळी काढावी ती काढताना मला ती अपुरी जाणवु लागली त्यानंतर मी छञपती शिवाजी महाराज, छञपती संभाजी महाराज हे आपल्या घराण्याची कुलदेवता असलेला श्रीतुळजाभवानी मातेची आरती करताना करतानाची रांगोळी काढावी असे सुचल्याने मी लगेच रांगोळी काढण्यास आरंभ केला काही तासात ही रांगोळी पुर्ण केली.
ही रांगोळी छञपती संभाजी महाराज जयंती दिना पर्यत ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे.रांगोळी माध्यमातून छञपती संभाजी महाराजांना जयंती दिना निमित्ताने मी अभिवादन करणार आहे.

 
Top