उस्मानाबाद / प्रतिनिधी-
तुळजापूर शहरालगत वरवंटी शिवारात जंगलातील शेकडो लहान मोठे प्राण्यांचा वावर आहे .हे प्राणी दुष्काळाच्या झळांनी ,जीवाची काहिली उठल्या नंतर शहरात व गाव खेड्यात पाण्यासाठी प्रवेश करतात .यात मोर, लांडगे, कोल्हे, हरीण यांच्यासह दुर्मीळ अशी नीलगाय , तरस, सायाल इत्यादी जंगली तथा सरपटणारे हजारो जीव या ठिकाणी वास्तव्य करतात .पाण्याच्या अभावी यातील बरेच जीव आपली तहान भागवण्यासाठी मानवी वस्तीत प्रवेश करतात व शिकार होतात या पार्श्वभूमीवर मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या माध्यमातून या हजारो मुक्या जीवांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाच्या साह्याने जंगलातील पूर्ण पाणवठे भरून घेतले जात आहेत..
  यावेळी मनसे जिल्हा सचिव दादा कांबळे, मनसे शिक्षक सेना नेते बबनराव वाघमारे सर यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते श्री अॅड सागर साळुंके, वसंत गरड,संजय चौगुले,उपस्थिती होते.
 
Top