उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कोव्हिड – 19 या साथरोगाच्या पार्श्वभुमीवर उस्मानाबाद नगर परिषदेचे काम युध्दपातळीवर चालु असून नगर परिषदेने आत्तापर्यंत बरेच लोकोपयोगी निर्णय घेतले व ते आमलात आणले जसे शहरातील नागरिकांना किराणा, भाजीपाला,फळे, मटन घरपोच  देण्यासाठी व्यापा-यांना पास देणे, शहरात 16 वरदळीच्या ठिकाणी ब्रेक द चैन अभियान राबवणे,संपुर्ण शहरात आत्ता पर्यंत 3 वेळेस जंतूनाशक फवारणी करण्यात आली आहे व आवश्यकता असेल तेथे तात्काळ जंतूनाशक फवारणी केली जाते. लॉकडाऊन च्या काळात नागरिक  अनाधिकृत पणे प्रवेश करतील हे लक्षात आल्यानंतर शहराच्या सर्व सीमांवरती पालिकेच्या वतिने कर्मचारी नेमून त्यांची नोंद घेण्यात आली.नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी दाखविलेल्या कार्य तत्परतेमुळे शहरवाशियामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
नगरपालिकेच्या   मार्फत  13,232  कुटूंबातील 52,921 व्यक्तींची थर्मामीटर व ऑक्सिमीटर  द्वारे तपासणी करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे शहरातील 19 प्रभागांमध्ये प्रभागनिहाय अधिका-यांची निवड करुन बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांची नोंदणी करून दवाखान्यात तपासणीसाठी पाठवणे. नेहरू चौक भागातील भाजीपाला विक्री मुळे जास्त गर्दी होत असल्याचे निदर्शनास आल्याने संपुर्ण उस्मानाबाद शहरामध्ये एकूण 12 ठिकाणे भाजीपाला विक्रेत्यांसाठी उपलब्ध केली.एकेरी मार्ग (Oneway)  च्या जुन्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.  तसेच नागरिकांच्या फोन द्वारे  समस्या जाणून घेऊन त्याचे निवारण करण्यासाठी नगर पालिकेत वॉररूम तयार करण्यात आली  त्या वॉररूम चे संपर्क क्रमांक 7796644117,7796644119, 7796644125, 7796644131 हे आहेत.  आत्ता पर्यंत नगर पालिकेने बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांची तपासणी करून 315 नागरिकांना होम (Home) क्वॉरंटाईन तर 305 लोकांना इंन्स्टिट्युशनल (Institutional) क्वॉरंटाईन केले आहे व होम क्वॉरंटाईन केलेल्या व्यक्तीच्या घरासमोर स्टिकर लावण्यात आले आहेत यात 14 दिवस पुर्ण झालेल्या व्यक्तींची संख्या 198 आहे तर 14 दिवस पुर्ण न झालेले 422 व्यक्ती आहेत असे मिळून एकूण 620 नागरिकांची नोंदणी झाली आहे .
शहरातील देवी मंदिर भागात एक कोरोना बाधित  रूग्ण सापडल्यानंतर सदर भाग सिल करून त्या भागाला कंन्टेंन्मेंट झोन म्हणुन जाहीर   केल्यामुळे त्या भागातील नागरिकांना बाहेर येता येनार नाही सदर भागातील नागरिक हे मोठ्या प्रमानात   रोजंदारीवर काम करून आपलं पोट भरतात हे लक्षात आल्यावर नगर पालिकेच्या वतीने अशा गरजू 275 कुटुंबांना धान्य तसेच प्रत्येक घरातील व्यक्तीला मास्क तसेच सॅनिटायझर देण्यात आले अशा प्रकारे जेथे तेथे कोरोना व्हायरस च्या विषाणू चा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर पालिका तत्पर उभी राहिलेली आहे व यापुढे ही अशाच प्रकारे नवनवीन उपाययोजना मा.नगराध्यक्ष श्री. मकरंद उर्फ नंदुभैय्या  राजेनिंबाळकर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणार आहेत त्यामुळे  नागरिकांनी योग्य  त्या सुचनांचे पालन करावे व सुरक्षित रहावे आणि प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. 
 
Top