उमरगा / प्रतिनिधी-
जागतिक परिचारिका दिनानिमित्त उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील सर्व परिचारिकांचा मंगळवारी उमरगा पंचायत समितीच्या सदस्या क्रांतीताई किशोर व्हटकर यांच्या वतीने मास्क व गुलाब देऊन सत्कार करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करत असलेल्या रुग्णसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. जीवाची पर्वा न करता आरोग्य विभागातील परिचारिका व आरोग्य कर्मचारी दिवसरात्र सेवा बजावत आहेत.
त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पंचायत समिती सदस्या क्रांतीताई व्हटकर यांनी सर्व परिचारिका, डॉक्टर व रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क व गुलाबपुष्प देऊन कृतज्ञता व्यक्त करत शुभेच्या दिल्या. १२ मे रोजी दरवर्षी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. १८५४ मध्ये झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांवर उपचार करणाऱ्या आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो.
यावेळी समर्पण सामाजिक संस्थेचे किशोर व्हटकर, उमरगा रोटरी क्लबचे सचिव प्रा. युसूफ मुल्ला, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, हुसेन पिरजादे, उपजिल्हा रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. व्ही. एस. बाबरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंडित पुरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम आळंगेकर, अधिसेविका जी. बी. जाधव, परिसेविका एस. एस. डोंगरे, डॉ. प्रवीण जगताप, क्ष-किरण तंत्रज्ञ गुंडू काळे उपस्थित होते.

 
Top