उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 लॉकडाऊनच्या काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे किट मोहम्मद हाफीज रहमान यांच्या वतीने वाटप करण्यात आले. उस्मानाबाद तालुक्यात 250 तर ताकविकी येथे 100 असे एकुण 350 किट वाटप करुन रमजान महिन्याच्या काळात त्यांनी गरजू कुटुंबाना दिलासा दिला आहे.
या किटमध्ये एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यात आले अहे. या कार्यासाठी त्यांना शहेजाद वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष गफार शेख, अंजुमन हेल्थकेअर सोसायटीचे अध्यक्ष फेरोज पल्ला उस्मानाबाद यांनी सहकार्य केले. यावेळी  जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे, आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ.शकिल अहमद खान, सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे, जमील अहमद, वसीम शेख, रहीम शेख उपस्थित होते.
 
Top