तुळजापूर / प्रतिनिधी-
कोरोना संसर्गजन्य आजाराचा पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यातील दारुची दुकाने बिअरबार विक्री जिल्हाधिकारींचा आदेशाने गेली  दीड महिन्या पासुन बंद आहेत  माञ तरीही तिप्पट चौप्पट दराने दारु गुटखा तंबाखु पुढी आजही विक्री होत आहे
काही ठिकाणी तर बिनधास्त पणे बनावट दारु ओरीजनल म्हणून विकली जात आहे यामुळे पिणा-यांचा आरोग्यांनवर मोठा परिणाम होत आहे. या प्रकरणी बिअरबार दारु दुकाने स्टाँक ची तपासणी ञस्त यंञणे मार्फत करून संबंधितांवर कारवाई ची मागणी होत आहे,सध्या शंभरची दारु बाटली चारशे रुपयाला तर दहा रुपयाची तंबाखु पुढी चाळीस तसेच गुटखा पुढ्याही याच भावात गुपचुप विकला जात आहे. काही महाभाग तर गावठी दारुत थंड पेय टाकुन विकत आहे. सध्या बार दारु विक्री दुकांनाच्या ऐवजी गल्लीबोळात तसेच  गावगावच्या हातभट्टी  दारु अड्यावर गर्दी होत आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर दारु विक्री बंदी आदैश निघताच दुकानातुन दारु विक्री बंद झाल्या माञ येथील बाटल्यांना पाय फुटुन  त्या बाटल्या ग्राहकाकडे चौपट दराने ओळखीच्या नियमीत ग्राहकाकडे निविघ्न पणे  पोहचत आहेत.विदेशी पिणारे हातभट्टीवर आले आहेत.संचार बंदी लाँकडाऊन काळात किमान ग्रामसमिती मार्फत दारु तंबाखू विक्री वर आळा घालणे गरजेचे आहे. यामुळे अनेकांचे दारु व्यसन सुटणे शक्य होते माञ नियमांची ग्रामसमिती व पोलिसांन कडून अमंलबजावणी केली जात नसल्याने बंदी असुन सुध्दा दारु तंबाखू ,गुटखा, विक्री छुप्या पध्दतीने सर्वाधिक दराने निर्विघ्न पणे सुरु असल्याची चर्चा नागरिकांन मधुन होत आहे
माञ याची माहीती उत्पादन शुल्क व  विभागाला कशी मिळाली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.आतातरी उत्पादन शुल्क विभागाने लक्ष घालुन संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी जनतेतुन होत आहे.

 
Top