लोहारा/ प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील साधना सेवा समितीच्या वतीने सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर देशातील आणि राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील साधना सेवा समितीच्या वतीने देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, वैद्यकीय सेवेत कार्यरत कर्मचारी, पोलीस अधिकारी यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत सामाजिक भावना जपत पंतप्रधान नागरिक साहाय्यता व आपातकालीन मदत निधी कक्षाला (पीएम केअर) शुक्रवार (दि.२९) रोजी ५१ हजाराची रक्कम मदत निधी म्हणून देण्यात आली.
सन २००८ साली सामाजिक बांधिलकीतुन स्थापन झालेल्या साधना सेवा समितीच्या वतीने ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या गुंजोटी गावच्या इतिहासावर आधारित ‘दिव्यत्वाची प्रचिती एक गाव गुंजोटी’ या पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या विक्रीतून जमा झालेली २५ हजाराची रक्कम व साधना सेवा समितीच्या सदस्यांनी जमा केलेल्या २६ हजाराचा निधी एकत्रित करून ५१ हजार रुपयांचा मदत निधी पंतप्रधान नागरिक साहाय्यता व आपातकालीन मदत निधी कक्षाला (पीएम केअर) देण्यात आला. व गेल्या बारा वर्षांपासून कार्यरत असणारी समिती सर्व सदस्यांच्या उपस्थितीत गोठवण्यात अली. बारा वर्षांपूर्वी गावातील जेष्ठ नागरिक एकत्र येत सामाजिक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने ही साधना सेवा समिती स्थापन केली होती. या समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षात गावात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी गावातील विविध भागात वृक्षारोपण, नाली खोदकाम, गावच्या भोगावती नदीतील गाळ   काढणे, आरोग्याच्या दृष्टीने हाडांची तपासणी, डोळे तपासणी यासारख्या आरोग्य शिबिराचे आयोजन करणे, कुपोषित बालकांसाठी सकस आहार पुरवणे, गावातील एक हजार नागरिकांना मोफत पर्यटनाची संधी उपलब्ध करून देणे, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन करणे, प्रकाश वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढविणे यासारखे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. दिनकरराव देशपांडे गुरुजी यांच्या घरी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात सर्व सदस्यांना शिल्लक पुस्तकांच्या प्रति भेट म्हणून देण्यात आल्या. यासाठी साधना सेवा समितीचे अध्यक्ष बसप्पा माळगे, चिटणीस रामराव चव्हाण, सदस्य दिनकरराव देशपांडे, भास्करराव देशपांडे, बालभीमराव शाईवाले, मोहन पाटील, राजेंद्र पाटील, श्रीमती वीरश्री देशपांडे, श्रीमती शोभाताई शाईवाले, सौ. जयश्री पाटील, सौ. रंजना शहा, दिनकरराव सूर्यवंशी या सदस्यांनी यासाठी पुढाकार घेतला. यावेळी प्रकाश वाचनालयाचे ग्रंथपाल नंदू शिंदे, दिलीप चौधरी उपस्थित होते.
 
Top