तेर/प्रतिनीधी-
उस्मानाबाद शिवसेना प्रमुख सतीष सोमाणी यानी आपल्या वाढदिव सानिमीत्त उस्मानाबाद तालुक्यातील 600 शिवसेना शाखा प्रमुखांचे शिवकवच या योजनेअंतर्गत विमा सरंक्षण एक वर्षासाठी काढले आहे.
उस्मानाबाद तालुका शिवसेना प्रमूख सतीष सोमाणी यानी स्वत:च्या वाढदिवसानिमीत्त  कुठलाही अनावश्यक खर्च न करता कोविड 19 सारख्या मगामारीतव जगासह भारतात तसेच महाराष्ट्र व उस्मानाबाद जिल्हा ,तालुका महामारीत ञस्त आहे.उस्मानाबाद तालुक्यातील प्रत्येक शाखेतील शिवसैनिक तसेच महीला शिवसैनिक अहोराञ काम करीत आहेत .शिवसैनिक हे अनेक वेळा सामाजिक कामामध्ये हीरीरीने भाग घेतात.त्यामुळे उस्मानाबाद तालुक्यातील सर्व मिळून 600 शाखाप्रमूख यांचा शिवसेनेशी सलंग्न असणा-या आनंदी प्रतिष्ठाण यांच्या वतीने शिवकवच योजने अंतर्गत सर्वाना विमा सरंक्षण पुढील एक वर्षासाठी नँशनल इन्शूरन्स कंपनी लिमीटेड या कंपनीतर्फे विमा पाँलीसी केली आहे अशी माहीती उस्मानाबाद तालुका शिवसेना प्रमुख सतीष सोमाणी यानी दिली.
 
Top